Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोर्तुगीजांचा खरा डाव ओळखला तो राम मनोहर लोहियांनी; इथून सुरू झाला गोवा मुक्तीचा लढा

गोवा मुक्तीदिन साजरा करण्यात येत आहे. गोव्याला पोर्तुगीजांपासून आज मुक्ती मिळाली. गोव्यात निर्माण झालेल्या जन आंदोलनात सर्वात मोठी भूमिका डॉ. लोहिया यांची होती. त्यांनी पोर्तुगीजांचा खरा डाव ओळखला होता.

  • By नारायण परब
Updated On: Dec 19, 2024 | 09:08 PM
पोर्तुगीजांचा खरा डाव ओळखला तो राम मनोहर लोहियांनी; इथून सुरू झाला गोवा मुक्तीचा लढा
Follow Us
Close
Follow Us:

गोवा भारतातील एक पर्यटन राज्य. या राज्याची संस्कृती, परंपरा आणि निसर्गसौदर्य हे देशी विदेशी पर्यटकांना नेहमीच साद घालत. येथील जीवनशैली, रात्रीचे जीवन हे लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. आज देशातील पर्यटन राज्य म्हणून गोव्याची एक विशेष ओळख आहे. मात्र या राज्याची भारतामध्ये सामिल होण्याचा इतिहास हा खूप वेगळा आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर  काही प्रदेश देशाच्या ताब्यात नव्हता. तेथे परकीयांचे राज्य होते. गोवा हे त्यातील एक राज्य होते ज्यावर तब्बल 450 वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले. स्वातंत्र्यानंतरही हे राज्य सुरु होते.

गोवा मुक्ती दिन

दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताचा हा स्वातंत्र्यलढा हा जगासाठी प्रेरणादायी होता मात्र त्यावेळी गोवा आणि काही प्रदेशांवर पोर्तुगीजांचे राज्य होते. तब्बल 14 वर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस होता आजचा दिवस. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारतामध्ये सामील झाला. तेव्हापासून दरवर्षी 19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

राम मनोहर लोहियांनी ओळखला पोर्तुगीजांचा डाव

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. ब्रिटिशांनी ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या हालचाली सुरु केल्या त्यावेळी पोर्तुगीजही गोव्याला मुक्त करतील असे समजले जात होते. पोर्तुगीजांची पुढची चाल त्यावेळी थोर समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी ओळखली होती की त्यांना गोवा मुक्त करायचा नाही. त्यामुळे  18 जून 1946 रोजी  लोहिया यांनी पहिल्यांदा पोर्तुगीजांना आव्हान दिले. त्यांच्या आव्हानाचे रुपांतरण नंतर तीव्र आंदोलनामध्ये झाले. त्यातूनच निर्माण झाला गोवा मुक्ती संग्राम. गोव्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी एक दीर्घकाळ लढा दिला.

डॉ. लोहियांनी स्वातंत्र्यसैनिक आणि साहित्यिकांनाही लढ्यात जोडले

गोवा मुक्ती संग्रामात डॉ. लोहियांनी उभ्या केलेल्या या आंदोलनात केवळ स्थानिक लोकांनाच नव्हे तर देशभरातील स्वातंत्र्यसैनिका सहभागी करुन घेतलेच त्याचबरोबर कोकणी आणि मराठी भाषेतील अनेक साहित्यिकांना गोवा मुक्ती चळवळीशी जोडले. या साहित्यिकांमध्ये बाळकृष्ण भगवंत बोरकर,  गजानन रायकर, मनोहरराव सरदेसाई, पु.ल.देशपांडे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर इत्यादी प्रमुख साहित्यिक होते त्यांनी आपल्या क्रांतिकारी लेखनाद्वारे गोमंतकांना स्वातंत्र्याच्या यागात सामील होण्याची प्रेरणा दिली.

अवघ्या 36 तासात पोर्तुगीजांची शरणागती

भारत सरकारनेही पोर्तुगीजांविरुद्ध कठोर भूमिका घेत “ऑपरेशन विजय” ची घोषणा केली आणि गोवा मुक्ती करिता 30 हजार सैनिकांची तुकडी पाठवली. त्यानंतर हवाई दल, नौदलाद्वारे हल्ला केला आणि पोर्तुगीजांनी अवघ्या 36 तासातच बिनशर्त सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर गोवा भारतामध्ये सामिल झाला गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला.  30 मे 1987 रोजी भारताच्या पूर्ण राज्याचा दर्जा गोव्याला देण्यात आला. त्यामुळे 30 मे हा दिवस गोव्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

आज 16 डिसेंबर 1971 च्या युद्धाची आठवण करून देणारा विजय दिवस; भारतापासून ते बांग्लादेशपर्यंत ‘असा’ साजरा केला जाणार

Web Title: The real fight for the liberation of goa began because of ram manohar lohia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 09:08 PM

Topics:  

  • day history
  • Goa
  • liberation

संबंधित बातम्या

वाचन-लेखनाची आवड असणाऱ्यांसाठी योग्य पर्याय! जाणून घ्या पात्रता व प्रवेश प्रक्रिया
1

वाचन-लेखनाची आवड असणाऱ्यांसाठी योग्य पर्याय! जाणून घ्या पात्रता व प्रवेश प्रक्रिया

Vijay Diwas 2025: ऐतिहासिक 16 डिसेंबर! याच दिवशी भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानी सैन्याने टेकले होते गुडघे
2

Vijay Diwas 2025: ऐतिहासिक 16 डिसेंबर! याच दिवशी भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानी सैन्याने टेकले होते गुडघे

Vande Mataram : एका पालखीचा ‘विलंब’ आणि झाला राष्ट्रगीताचा जन्म; बंकिमचंद्रांनी ‘अशी’ रचली राष्ट्रभक्तीची अजरामर गाथा
3

Vande Mataram : एका पालखीचा ‘विलंब’ आणि झाला राष्ट्रगीताचा जन्म; बंकिमचंद्रांनी ‘अशी’ रचली राष्ट्रभक्तीची अजरामर गाथा

National Cupcake Day: आज आहे ‘नॅशनल कपकेक डे’! गोडवा आणि आनंदाचा सर्वात चविष्ट दिवस; जाणून घ्या याचे महत्व
4

National Cupcake Day: आज आहे ‘नॅशनल कपकेक डे’! गोडवा आणि आनंदाचा सर्वात चविष्ट दिवस; जाणून घ्या याचे महत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.