Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारणामुळे झाला ओडिशातील भीषण रेल्वे अपघात, संयुक्त तपास अहवालात धक्कादायक माहिती आली समोर

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 03, 2023 | 03:18 PM
ssskid-3-new

ssskid-3-new

Follow Us
Close
Follow Us:

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Odisha train accident) 250 हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे तर सुमारे एक हजार लोक जखमी झाले आहेत. तीन गाड्यांच्या या भीषण धडकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्यामध्ये अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड उघड झाला आहे.

[read_also content=”रेल्वेरुळ झाले वेगळे, चाकं निघाली; गॅस कटरने बोगी कापून बाहेर काढले जात आहेत मृतदेह https://www.navarashtra.com/india/odisha-train-accident-death-toll-rises-to-233-900-people-are-serious-railway-minister-ashwini-vaishnav-presented-nrps-409143.html”]

नेमकं काय घडलं?

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताबाबत (Odisha train accident) संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. या अहवालात सिग्नलमधील बिघाड हे अपघाताचे कारण सांगितले जात आहे. या अहवालानुसार, मालगाडी लूप लाइनवर उभी होती, सिग्नल समस्येमुळे कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, मालगाडी बहनगा बाजार स्टेशनवर लूप लाइनमध्ये उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. दुसरी ट्रेन पास करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर लूप लाइन आहे. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनवरून पास करावी लागते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते. बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पास करण्यासाठी, मालगाडी सामान्य लूप लाइनवर उभी करण्यात आली. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही डाऊन मार्गावरून जात होती.

बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग वेगवान होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली. रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे मालगाडीला धडकले. अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या मागचे दोन डबे रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसलाही धडकले.

मृतांच्या कुटुंबीयांना 12 लाख रुपये मदत जाहीर

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सांगितले की, ओडिशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50-50 हजार रुपये दिले जातील. रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2-2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50-50 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Web Title: The reason behind odisha train accident is revealed in accident joint investigation report nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2023 | 03:17 PM

Topics:  

  • Odisha Train Tragedy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.