जगदीप धनखड यांजा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, कोण होणार आता या पदावर विराजमान? (फोटो सौजन्य-X)
Jagdeep Dhankhar Resignation News In Marathi : सोमवारी जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यांनी राजीनाम्याचे कारण आरोग्यविषयक कारणे असल्याचे सांगितले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे आणि मी तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो असे म्हटले आहे. याचदरम्यान आपल्या प्रकृतीचे कारण देत जगदीश धनखड यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कोण विराजमान होईल याची चर्चा सुरु झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जगदीप धनखड यांना भारताच्या उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.”
Shri Jagdeep Dhankhar Ji has got many opportunities to serve our country in various capacities, including as the Vice President of India. Wishing him good health.
श्री जगदीप धनखड़ जी को भारत के उपराष्ट्रपति सहित कई भूमिकाओं में देश की सेवा करने का अवसर मिला है। मैं उनके उत्तम…
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2025
सोमवारी संध्याकाळी उशिरा धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात धनखड म्हणाले की, आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार तात्काळ प्रभावाने उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.
राष्ट्रपतींनी धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्यानंतर, गृह मंत्रालयाकडे पुढे पाठवण्यात आला आहे. गृह मंत्रालय लवकरच उपराष्ट्रपती पदाबाबत राजपत्रित अधिसूचना जारी करेल असे मानले जात आहे.
दरम्यान, जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सकाळचे कामकाज पाहिले. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने. सहसा धनखड दिवसाच्या सुरुवातीला राज्यसभेचे कामकाज पाहत असत. ७४ वर्षीय जगदीप धनखड यांनी ३ वर्षांपूर्वी ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. परंतु धनखड यांचा राजीनामा संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे त्यांची अँजिओप्लास्टी झाली. या वर्षी मार्चमध्ये त्यांना काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अचानक राजीनामा दिल्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. धनखड यांचा हा राजीनामा त्यांच्याबद्दल बरेच काही सांगतो आणि त्यांना उपाध्यक्षपदावर आणणाऱ्यांच्या हेतूंवरही गंभीर प्रश्न उपस्थित करतो, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस (संवाद प्रभारी) जयराम रमेश म्हणाले की, जगदीप धनखड यांनी काल दुपारी १२:३० वाजता राज्यसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीचे अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर दुपारी १ ते ४:३० दरम्यान काहीतरी मोठे घडले की केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि किरण रिजिजू हे व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीला पोहोचले नाहीत. ते नियम, शिष्टाचार आणि नियमांबद्दल खूप सतर्क होते आणि त्यांच्या कार्यकाळात या नियमांचे सतत उल्लंघन केले जात आहे, असा त्यांचा विश्वास होता. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सरकारने काहीही सांगितलेले नाही.