प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जमशेद पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार. नुपूरने तिच्या अटकेला स्थगिती द्यावी आणि तिच्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला ट्रान्सफर करण्याची मागणी नव्या याचिकेद्वारे केली आहे.
याआधी 1 जुलै रोजी या खंडपीठात नुपूर यांची यापूर्वीची याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली होती. तेव्हा खंडपीठाने कठोर शब्दात टिप्पणी करत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
[read_also content=”प्रख्यात गायक भूपिंदर सिंह यांचे निधन, बॉलिवूडमधील अनेकांनी व्यक्त केली हळहळ https://www.navarashtra.com/movies/famous-singer-bhupinder-singh-passed-away-many-people-in-bollywood-expressed-their-grief-305665.html”]