Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Threat-email : सोमनाथ मंदिर, गुजरातमधील भाजप कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी, सर्च ऑपरेशन करताच निघाला फुसका बार!

Threat-email : गुजरात पोलिसांच्या गुप्त विभागाला सोमवारी सकाळी सोमनाथ मंदीर व भाजप कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली. धमकीनंतर मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 21, 2026 | 07:21 PM
Threat-email : सोमनाथ मंदिर, गुजरातमधील भाजप कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, सर्च ऑपरेशन करताच निघाला फुसका बार!

Threat-email : सोमनाथ मंदिर, गुजरातमधील भाजप कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, सर्च ऑपरेशन करताच निघाला फुसका बार!

Follow Us
Follow Us:
  • गुजरातमधील प्रमुख ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवली
  • अतिरिक्त पोलीस दल तैनात
  • धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू
 

जगप्रसिद्ध सोमनाथ मंदिर आणि अहमदाबाद व गांधीनगरस्थित भाजप कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी एका ई-मेलद्वारे (Threat-email)देण्यात आली. हा धमकीचा मेल येताच गुजरातमध्ये सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना शोधकार्यात काहीच हाती लागले नाही.

पोलीस प्रशासनाला धमकिची माहिती मिळताच बॉम्ब डिटेक्शन, डिफ्यूज टिम आणि डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून शोध मोहिम हाती घेण्यात आली. धमकीत अहमदाबादच्या खानपुर परिसरातील भाजप कार्यालय, गांधीनगरच्या कोबास्थित पक्षाचे राज्य कार्यालय कमलम आणि सोमनाथ मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, शोधकार्यादरम्यान या ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

राज्य गुप्त विभागाला सूचना

अहमदाबाद सी-डिव्हिजनचे एसीपी अद्वैत गांधी यांनी सांगितले की, गांधीनगर स्थित राज्य गुप्त विभागाला सकाळी 9 वाजता याबाबत सूचना प्राप्त झाली, ज्यानंतर खानपुर स्थित भाजप कार्यालयात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी आम्ही अतिरिक्त पोलीस दलही तैनात केले होते.
गांधी यांनी स्पष्ट केले की, सोमनाथ मंदीर आणि कोबा येथील भाजप कार्यालयाचा देखील धमकीच्या ई-मेलमध्ये उल्लेख होता. पण आम्हाला तेथेही काहीच संशयास्पद आढळले नाही. तेथील स्थिती सामान्य होती. तसेच नागरिकांनी विनाकारण घाबरू नये, पोलीस याबाबत सखोल चौकशी करत असल्याचे गांधी यांनी सांगितले.

Bangali Bhasha Diwas : २० सप्टेंबरला ‘बंगाली भाषा दिवस’ घोषित करण्याची एबीव्हीपीची मागणी ; ‘या’ दिवशी जगभरात साजरा होतो हा दिवस!

सोमनाथ मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली

तसं पाहता, सोमनाथ मंदिर परिसरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर बंदी असलेल्या वस्तू नेता येत नाहीत. मंदीरात २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. भाविकांची येथे दोन ठिकाणी तपासणी केली जाते. तसे असले तरी सोमनाथ येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी एम. एफ. चौधरी यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही मंदिराची सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. नागरिकांनी व भाविकांनी घाबरण्याचे कारण नाही.

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!

Web Title: Threat email to somnath mandir and bjp office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Gujrat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.