Indin Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!, सौजन्य :एआयएनएस
भारतीय सैन्यां (Indin Aarmy) च्या ताफ्यातील प्रशिक्षित श्वानांनी भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या ‘युद्ध अभ्यास २०२६’ मध्ये भाग घेतला. राइस, विक्टर, जॅक आणि राउडी नावाच्या या प्रशिक्षित चार श्वानांनी विशेष मोहिमांदरम्यान सैनिकांना मदत करण्याच्या आपल्यातील क्षमतेचे दर्शन घडवले. त्यांचे ते कौशल्य पाहता अमेरिकेचे सैन्य चक्क थक्क झाले होते.
या अभ्यासादरम्यान या श्वानांनी एका संशयित ठिकाणी प्रवेश केला व दोरीच्या सहाय्याने खाली उतरणासारख्या प्रशिक्षणात भाग घेतला. भारतीय सैन्यांच्या ताफ्यातील हे प्रशिक्षित श्वान कशाप्रकारे आपल्या देशाच्या सैनिकांना मदत करतात याचे प्रात्याक्षिक अमेरिकन सैन्यांना अत्यंत जवळून पाहण्यास मिळाले.
महत्त्वाचे म्हणजे हे चारही प्रशिक्षित श्वान वेगवेगळ्या प्रजातीचे आहेत. राउडी आणि विक्टर हे स्वदेशी रामपुर हाउंड या प्रजातीचे आहेत. चांगली गोष्ट म्हणजे, भारतीय सैन्यांच्या मोठ्या मोहिमांत भारतीय प्रजातीच्या श्वानांचा वापर लक्षणीयरित्या वाढत आहे. तसेच जॅक हा बेल्जियन मॅलिनॉइस, तर राइस हा लॅब्राडॉर रिट्रीवर प्रजातीचा आहे.
या प्रशिक्षित श्वानांकडे भारताच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती भागातील तैनातीचा अनुभव आहे. रामपुर हाउंड प्रजातीच्या श्वानांनी मणिपूरमधील एका मोहिमेदरम्यान आयईडी म्हणजेच इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव डिव्हाइसला शोधण्याच महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
सैन्य दलाच्या मते, या चारही श्वानांच्या भाऊ-बहिणींना ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जालंधर आणि अमृतसरच्या विविध सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले होते. यामुळे विविध परिसर आणि परिस्थितीमध्ये या प्रशिक्षित श्वानांची अनुकूल क्षमता समोर आली. अशात युद्ध अभ्यास २०२६ मधील त्यांच्या भागीदारीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, हे प्रशिक्षित श्वान भारतीय सैन्यांच्या ताफ्यातील महत्त्वाचे सहकारी बनले आहेत.
दरम्यान, दोन्ही देशांमधील युद्ध अभ्यासाचा हा २२ वा हंगाम उत्तराखंडचा बर्फाळ डोंगरभाग औलीपासून राजस्थानच्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजपर्यंत सुरू आहे. सरावादरम्यान भारत आणि अमेरिकेच्या प्रत्येकी ६०० जवानांनी यात भाग घेतला आहे. या अभ्यासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. सैन्य गस्तीसाठी ड्रोन व इतर प्रणालींचा वापरही करण्यात येत आहे.
Indian Air Force: भारतीय हवाई दलाची ताकद वाढली! HAL कडून नवीन तेजस आणि HTT-40 विमाने सुपूर्द






