Bangali Bhasha Diwas : २० सप्टेंबरला 'बंगाली भाषा दिवस' घोषित करण्याची एबीव्हीपीची मागणी ; 'या' दिवशी जगभरात साजरा होतो हा दिवस! सौजन्य : एआयएनएस
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (एबीव्हीपी) ने पश्चिम बंगाल सरकारकडे २० सप्टेंबरला राज्यात ‘बंगाली भाषा दिवस’च्या (Bangali Bhasha Diwas) रुपात घोषित करण्याची मागणी केली आहे. एबीव्हीपीने उत्तर दिनाजपुरच्या दारीभीटमध्ये २० सप्टेंबर २०१८ ला झालेल्या घटनेत जीव गमावणाऱ्या राजेश सरकार आणि तपस बर्मन यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या दिवसाला अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली आहे. एबीव्हीपीच्या या मागणीने पश्चिम बंगालमध्ये प्रांतिक भाषेचा वाद पेटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे.
दारीभीटमध्ये घडलेल्या घटनेत राजेश सरकार व तपस बर्मन यांचा पोलिसांच्या फायरिंगमध्ये मृत्यू झाला होता. अशात एबीव्हीपीचे म्हणणे आहे की, या दोघांनी मातृभाषेचा अधिकार आणि संरक्षणाशी निगडीत असलेल्या आंदोलनादरम्यान आपला जीव गमावलेला. त्याच आधारे एबीव्हीपीने २० सप्टेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘बंगाली भाषा दिवस’च्या रुपात साजरा करण्याची मागणी केली आहे.
एबीव्हीपी मान्य करते की, २१ फेब्रुवारीला जगभरात बंगाली भाषा दिवस साजरा केला जातो, मात्र त्यांच्या मते, याची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही तत्कालीन पूर्व पाकिस्तान आणि सध्याचा बांगलादेशातील भाषेशी निगडीत आहे. एबीव्हीपीचा असा युक्तिवाद आहे की, रवींद्रनाथ टागोर आणि काजी नजरुल इस्लाम यांच्या सारख्या साहित्यिकांच्या वारशाशी जोडलेल्या पश्चिम बंगालमध्ये मातृभाषेशी संबंधित दारीभीट येथील घटनेलाही योग्य स्मरण आणि अधिकृत मान्यता मिळायला हवी.
यासोबतच एबीव्हीपीने भाषा दिवस घोषित करण्यासह दारीभीट घटनेची निष्पक्ष आणि तातडीने चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमागील सत्य परिस्थिती आणि जबाबदार लोकांची भूमिका समोर आणण्यासह त्यांना अटक करण्यात यावी असेही त्यांच्यावतीने सांगण्यात आले.
या मागणीसह एबीव्हीपीने रविवारी २० सप्टेंबरला पश्चिम बंगालमधील अनेक महाविद्यालयांमध्ये बंगाली भाषा दिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यावतीने राजेश सरकार व तपस बर्मन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह






