
Court Decision
पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना धमकीची पत्रे (Pakistan News) आली आहेत. धमक्या देणाऱ्यांनी न्यायाधीशांना विषारी पावडरही (Pakistan News) पाठवली आहे. या घटनेनंतर सरकार आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. धमकी मिळाल्यानंतर न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांच्या घरापासून ते कोर्टापर्यंत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आल्याने कोर्टात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे.
[read_also content=”छत्तीसगडमध्ये 8 तासांत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! https://www.navarashtra.com/india/13-naxalites-died-in-encounter-with-security-force-at-chhattisgarh-nrps-520601.html”]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना धमकीची पत्रे पाठवल्यानंतर लाहोरच्या चार न्यायाधीशांना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना धमकीची पत्रे आली आहेत. सरन्यायाधीश काझी फैज इसा यांचाही ज्या न्यायाधीशांना धमकीची पत्रे मिळाली आहेत. बॅसिलस अँथ्रॅसिस हा इंग्रजी शब्दही पत्रात वापरण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या सर्व न्यायाधीशांना दिलेल्या धमकीच्या पत्रात न्यायाधीशांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. धमकीच्या पत्रात बॅसिलस अँथ्रासिस हा इंग्रजी शब्द वापरून इशारा देण्यात आला आहे. यासोबतच धमकीच्या पत्रात पाकिस्तानच्या न्यायाधीशांना सामान्य लोकांच्या समस्यांसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना लिफाफा सापडल्यानंतर त्यांनी तो उघडला तेव्हा त्यात एक पत्र आणि संशयास्पद पांढरी पावडर आढळून आली, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. यानंतर उच्च न्यायालय परिसराची सुरक्षाही वाढवण्यात आली होती.