Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक होणाऱ्या राज्यांत केंद्राकडून निधींचा पाऊस; तीन राज्यांना मिळणार 9234 कोटी

केंद्र सरकारने १६ व्या वित्त आयोगाच्या अहवालात सुचवलेल्या सर्व सुधारणा स्वीकारल्या आहेत आणि या शिफारशींच्या आधारे पुढील वर्षासाठी निधी वाटप करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2026 | 09:20 AM
निवडणूक होणाऱ्या राज्यांत केंद्राकडून निधींचा पाऊस

निवडणूक होणाऱ्या राज्यांत केंद्राकडून निधींचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या राज्यांत यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या चार राज्यांपैकी तीन राज्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत केंद्रीय कर आणि शुल्काचा जास्त वाटा मिळेल. या राज्यांना एकूण ९२३४ कोटी मिळतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत १६ वा वित्त आयोगाचा अहवाल सादर केला. यामध्ये त्यांनी आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा वाटा वाढवला जाईल.

सध्या, आसाममध्ये भाजपचे राज्य आहे, तर उर्वरित राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार आहे, ज्यामुळे केंद्रातील भाजप सरकारसमोर राजकीय आव्हान निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, केंद्र सरकारने १६ व्या वित्त आयोगाच्या अहवालात सुचवलेल्या सर्व सुधारणा स्वीकारल्या आहेत आणि या शिफारशींच्या आधारे पुढील वर्षासाठी निधी वाटप करण्यात आला आहे. १६ व्या वित्त आयोगाने केंद्रीय करांमध्ये राज्यांच्या वाट्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यावेळी केरळला सर्वाधिक फायदा होईल.

केरळचा केंद्रीय कर वाटा २.३८२ टक्क्यांनी वाढेल, जो १५ व्या वित्त आयोगात १.९२५ टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. नवीन तरतुदींनुसार, केरळला आता अतिरिक्त ६,९७५ कोटी रुपये मिळतील. दुसरीकडे, आसामला १९९४ कोटी रुपये मिळतील आणि तामिळनाडूला २७५ कोटी रुपये मिळतील. १५ व्या वित्त आयोगाच्या तुलनेत यावेळी पश्चिम बंगालला थोडा कमी वाटा मिळाला आहे. तथापि, २०२६-२७ या आर्थिक वर्षात पश्चिम बंगालला ४,७०० कोटी रुपये मिळतील.

स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा

१६ व्या वित्त आयोगाच्या अहवालात स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ७.९१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ४.३५ लाख कोटी रुपये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, ज्यात ग्रामपंचायती, ब्लॉक पंचायती आणि जिल्हा पंचायतींचा समावेश आहे. शिवाय, १६ व्या वित्त आयोगाच्या अहवालात राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती निवारण निधीसाठी एकूण २०४४०१ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा : Chandrapur News: अन्नदात्याला न्याय मिळाला का? अर्थसंकल्पावरून राजकीय वाद पेटला; सत्ताधाऱ्यांकडून कौतुक, विरोधकांची टीका

Web Title: Three states will receive 9234 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Government Decision
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

‘2035 पर्यंत एसटी बसेस पूर्णत: होणार इलेक्ट्रिक’; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
1

‘2035 पर्यंत एसटी बसेस पूर्णत: होणार इलेक्ट्रिक’; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.