Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Public Interest Litigation: ‘जनहित याचिका आता रद्द करण्याची वेळ आलीय!’; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक विधान

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपल्या युक्तिवादात जनहित याचिकांच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. जनहित याचिकांची संकल्पना अशा काळात सुरू झाली होती,

  • By anuradha sagar
Updated On: Apr 09, 2026 | 03:23 PM
Supreme Court, Collegium, Justice PS Narasimha, Indian Judiciary,

Supreme Court, Collegium, Justice PS Narasimha, Indian Judiciary,

Follow Us
Follow Us:
  • आता जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याचीच नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ- केंद्र सरकार
  • अनेक जनहित याचिकांमागे जनहित नसून वैयक्तिक स्वार्थ किंवा विशिष्ट अजेंडा असतो- केंद्र सरकार
  • PIL ची सुरुवात ज्या सामाजिक विषमतेमुळे झाली होती, ती दरी आता तंत्रज्ञानाने भरून काढली – केंद्र सरकार
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या ऐतिहासिक खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच, केंद्र सरकारने जनहित याचिकांच्या (PIL) आवश्यकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “आता जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याचीच नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली आहे,” असे खळबळजनक विधान केंद्र सरकारने न्यायालयात सादर केलेल्या लेखी युक्तिवादात केले आहे. शबरीमला प्रकरणातील पुनर्विलोकन याचिकांमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सुनावणी करणाऱ्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा युक्तिवाद मांडला.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपल्या युक्तिवादात जनहित याचिकांच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. जनहित याचिकांची संकल्पना अशा काळात सुरू झाली होती, जेव्हा गरिबी, निरक्षरता आणि संसाधनांच्या अभावामुळे समाजातील मोठा वर्ग न्यायालये गाठू शकत नव्हता. पण आज तंत्रज्ञान आणि ‘ई-फायलिंग’ (E-filing) सारख्या सुविधांमुळे सर्वसामान्यांसाठी न्यायालयाचे दरवाजे उघडले आहेत. आता केवळ एका पत्राद्वारेही नागरिक थेट न्यायालयात आपले म्हणणे मांडू शकतात. त्यामुळे आता PIL ची विशेष गरज उरलेली नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

BJP आणि RSS विषारी साप…! मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्याचा नितीन नबीन यांनी घेतला खरपूस समाचार

‘विशिष्ट हेतू असलेली याचिका’

सॉलिसिटर जनरल म्हणाले की, ई-फायलिंगसारख्या सुविधांमुळे सर्वसामान्य माणसाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात पोहोचणे सोपे झाले आहे. आता एखाद्या विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी याचिका दुसऱ्या कोणीतरी दाखल करण्याची गरज राहिलेली नाही. तसेच, जनहित याचिकेच्या नावाखाली दाखल होणाऱ्या बहुतांश याचिकांमागे एक छुपा हेतू असतो. त्यामागे कोणीतरी वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही मेहता यांनी यावेळी केली.

सरकारच्या मागणीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची प्रतिक्रीया?

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सॉलिसिटर जनरल यांच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवली आणि म्हणाले की, न्यायालये जनहित याचिकांबाबत अधिक सावध झाली आहेत. जनहित याचिका स्वीकारण्यापूर्वी न्यायालये आता अत्यंत सावधगिरी बाळगतात. त्या दाखल करण्यामागील कारणांची ते बारकाईने तपासणी करतात. आता ज्या याचिकांमध्ये गुणवत्ता किंवा ठोस आधार असतो, त्यांच्यावरच नोटीस बजावली जाते. २००६ ते २०२६ या २० वर्षांच्या काळात बरेच काही बदलले आहे. अशी शक्यता आहे की, जनहित याचिकांची यापुढे गरज भासणार नाही.

PM Modi in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये PM मोदींचा एल्गार

सर्वोच्च न्यायालयात ५० हून अधिक पुनर्विलोकन याचिका

दरम्यान, धार्मिक स्थळांवर महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा गेल्या २६ वर्षांपासून देशाच्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. २०१८ मध्ये, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ४:१ बहुमताने मंदिरांमध्ये महिलांच्या प्रवेशावरील बंदी उठवली होती. त्यानंतर अनेक पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ ७ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान ५० हून अधिक याचिकांवर सुनावणी घेणार आहे. पुनर्विलोकन याचिकाकर्ते आणि त्यांचे समर्थक ७ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान आपला युक्तिवाद सादर करतील, तर याचिकेला विरोध करणारे १४ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान आपला युक्तिवाद सादर करतील.

 

Web Title: Time to scrap pils central govts sensational argument in supreme court during sabarimala hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Government of India
  • Supreme Court of India

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.