
TMC MP Saugata Roy smoked an e-cigarette in the Parliament premises marathi news
गुरुवारी, ११ डिसेंबर रोजी संसदेच्या आवारात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार सौगत रॉय ई-सिगारेट ओढताना दिसून आले. एका व्हिडिओमध्ये सिगारेटमधून धूर काढताना ते कैद झाले. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे आता टीएमसी खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, भाजप नेते गिरिराज सिंह आणि गजेंद्र शेखावत रॉय यांच्याशी बोलताना दिसत आहेत, यावेळी त्यांनी संसदेच्या आवारामध्ये ई-सिगारेट ओढली. संसदेच्या आवारात धुम्रपान करत खासदार सौगत रॉय यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि इतरांचे आरोग्य धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे.
TMC सांसद के 30 मीटर दूर सिगरेट पीने से गिरिराज सिंह जी के नाक में इरीटेशन हो जाती है , लेकिन देश और दिल्ली की गंदी हवा से निपटने के लिए स्पॉटीफाई में वंदे मातरम् चला के अनुलोम विलोम और कपाल भाटी से काम चला लेते हैं। pic.twitter.com/INXYKM3bMY — खुरपेंच (@khurpenchh) December 12, 2025
अनुराग ठाकूर यांच्या आरोपांना उत्तर देताना सौगत रॉय यांनी सांगितले की त्यांना या घटनेची माहिती नव्हती. रॉय यांनी स्पष्ट केले की ते संसद भवनात धूम्रपान करत नव्हते आणि त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. सौगत रॉय म्हणाले, “मी यावर भाष्य करू शकत नाही कारण मी सभागृहात नव्हतो आणि मला माहित नाही की कोणी धूम्रपान केले किंवा कोणी तक्रार केली. चौकशी करणे आणि कारवाई करणे हा सभापतींचा अधिकार आहे… याला राजकीय मुद्दा का बनवले जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आवारात धूम्रपान करण्याला दिले समर्थन
टीएमसी खासदार सौगत रॉय यांनी असेही सांगितले की संसद संकुलाच्या खुल्या परिसरात धूम्रपान करण्यास परवानगी आहे आणि फक्त संसद भवनाच्या आतच बंदी आहे. माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, “तुम्ही आता सभापती झाला आहात का? फक्त मोबाईल फोन घेऊन स्वतःला सुधाराल का?” असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना औपचारिकपणे पत्र लिहून गंभीर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदाराने संसदीय नियम आणि वैधानिक कायद्यांचे उल्लंघन केले आहे.