Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजम्याची दोरी तोडणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही,” हायकोर्टने निकालात नेमकं काय म्हटलं?

अल्पवयीन मुलीचे स्तन पकडने, तिच्या पायजम्याचे दोरी तोडणे, कपडे काढण्याचा प्रयत्न करणे आणि तिला ओढण्याचा प्रयत्न करणे हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2025 | 12:37 PM
हायकोर्टने निकालात नेमकं काय म्हटलं? (फोटो सौजन्य- pinterest)

हायकोर्टने निकालात नेमकं काय म्हटलं? (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाची नाराजी
  • मुलीला नाल्याखाली ओढण्याचा प्रयत्न करणे हे बलात्काराचा प्रयत्न नाही
  • उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध स्व-मोटो याचिकेवर सुनावणी
Allahabad High Court News in Marathi : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून महिला अत्याचाराच्या 14 घटना समोर आल्या आहेत, अशातच अल्पवयीन मुलीच्या संदर्भात अलहाबाद उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. त्या निर्णयावर मात्र सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. अल्पवयीन मुलीचे स्तन पकडून नेणे, तिच्या पायजम्याची दोरी तोडणे, तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न करणे आणि तिला नाल्याखाली ओढण्याचा प्रयत्न करणे हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न नाही, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल देत हे विधान केलंय. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध स्व-मोटो याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवल आहे.

मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर खटल्याच्या सुनावणीदरम्यान, वकिलांनी निदर्शनास आणून दिले की, या प्रकरणाव्यतिरिक्त अनेक उच्च न्यायालयांनी अलीकडेच लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये अशाच तोंडी आणि लेखी टिप्पण्या दिल्या आहेत. ज्येष्ठ वकील शोभा गुप्ता यांनी खंडपीठाला सांगितले की, अलिकडच्याच एका प्रकरणात, अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे म्हटले होते की, रात्रीची वेळ असल्याने, ते आरोपींसाठी “आमंत्रण” होते. त्यांनी कोलकत्ता आणि राजस्थान उच्च न्यायालयांमधील अशाच प्रकारच्या प्रकरणांचाही उल्लेख केला. दुसऱ्या वकिलाने खंडपीठाला जिल्हा न्यायालयातील एका खटल्याचा संदर्भ दिला जिथे न्यायालयीन कामकाज कॅमेऱ्याच्या समोर असूनही, अनेक लोक उपस्थित होते आणि सुनावणीदरम्यान पीडितेचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

श्री चंद्रशेखर होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश? सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची शिफारस

अशा टिप्पण्यांचा समाजावर नकारात्मक परिणाम

मुख्य न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “जर तुम्ही या सर्व प्रकरणांचा उल्लेख करू शकत असाल तर आम्ही व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा विचार करू शकतो.” त्यांनी पुढे म्हटले की, अशा कोणत्याही असंवेदनशील टिप्पण्यांचा आणि न्यायालयीन टिप्पण्यांचा पीडितांवर, त्यांच्या कुटुंबांवर आणि संपूर्ण समाजावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हे पीडितांना जबरदस्ती करण्याच्या पद्धती आहेत. शिवाय कधीकधी, अशा पद्धतींचा वापर त्यांना त्यांच्या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हे उच्च न्यायालयाचे निरीक्षण होते आणि जिल्हा न्यायालयाच्या पातळीवर ते विचारात घेतले जाऊ नयेत आणि आम्ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करू इच्छितो. खंडपीठाने वकिलांना पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी संक्षिप्त लेखी सूचना सादर करण्यास सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

१० नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील पटियाली पोलीस स्टेशन परिसरात हीच घटना घडली. यामध्ये एका महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली होती. यामध्ये ती म्हणते, ‘मी माझ्या १४ वर्षांच्या मुलीसोबत कुठेतरी जात असताना, पवन, आकाश आणि अशोक नावाच्या तीन तरुणांनी मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुचाकीवर बसवले. आरोपीने वाटेत एका कल्व्हर्टजवळ गाडी थांबवली आणि मुलीचे स्तन पकडून तिच्या पायजम्याची दोरी तोडली. त्यानंतर चुकीच्या हेतूने त्यांनी तिला नाल्याखाली ओढायला सुरुवात केली. मुलीने केलेला आरडोओरडा ऐकून तिथे लोकांची गर्दी जमली आणि आरोपी माझ्या मुलीला घटनास्थळी सोडून पळून गेला, असे महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध बलात्कारासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि गुन्हा करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोक्सो कायद्याच्या कलम 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाने या कलमांखाली आरोपींविरुद्ध समन्स जारी केले.

“मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Web Title: Touching a minor girls breast is not rape supreme court upset with allahabad high courts decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • High court
  • Supreme Court
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य; CJI म्हणाले, ‘भारत सरकारने गंभीर…’
1

Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य; CJI म्हणाले, ‘भारत सरकारने गंभीर…’

क्राईम पेट्रोल पाहून MBA च्या विद्यार्थ्याने रचला कट, ऑनलाइन शस्त्रे मागवली अन्…, हत्याकांड कसं आला समोर ?
2

क्राईम पेट्रोल पाहून MBA च्या विद्यार्थ्याने रचला कट, ऑनलाइन शस्त्रे मागवली अन्…, हत्याकांड कसं आला समोर ?

बाप नंबरी बेटा 10 नंबरी! पासपोर्ट प्रकरणात ‘या’ नेत्याला कोर्टाने सुनावली 7 वर्षांची शिक्षा
3

बाप नंबरी बेटा 10 नंबरी! पासपोर्ट प्रकरणात ‘या’ नेत्याला कोर्टाने सुनावली 7 वर्षांची शिक्षा

मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार की नाही? नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4

मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार की नाही? नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.