
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं घडलं?
सुशील कुमार हा गावात शेती करत असे. सुनीलची पत्नी गर्भवती असून तिला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या खर्चासाठी नातेवाईकांकडून २५ हजार रुपये उसने घेऊन तो घरी आला होता. यांनतर हे पैसे घेऊन तो रुग्णालयात जात होता. मात्र रुग्णालयात तो पोहोचू शकला नाही. त्याचा वाटेतच घात झाला. त्याचा मृतदेह गावातील बाजहा बाबा मंदिराच्या गेटला लटकवण्यात आले होते. ही बातमी गावकऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली.
गावकऱ्यांचा आरोप काय?
या प्रकरणी गावकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी आरोप केला की ही आत्महत्या नसून हत्या आहे. ज्याप्रकारे त्याचा मृतदेह गेटला लटकला होता, त्यावरून गावकऱ्यांनी हा अरोप केला आहे. आधी त्याची हत्या करण्यात आली आणि ती आत्महत्या वाटावी म्हणून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवण्यात आला. पोलीस दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला.
गावकऱ्यांमध्ये तणावाचे वातारण
सुशील कुमार यांचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच ही घटना हत्त्या आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल. सध्या पोलीस विविध बाजूनी तपास करत आहेत. या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Ans: शेतकऱ्याचा मृतदेह मंदिराच्या गेटला लटकलेला आढळला.
Ans: ही आत्महत्या नसून आधी हत्या करून मृतदेह लटकवण्यात आला.
Ans: मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे