(फोटो सौजन्य- सोशल मिडीया)
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार २० जून रोजी चैन्नई दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी २ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यामध्ये चेन्नई ते नगरकोइल आणि मदुराई ते बंगळुरू या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. तसेच या दौऱ्यावेळी मोदी तामिळनाडूमधील अनेक प्रकल्पांचे देखील उद्घाटन करणार आहेत. तमिळनाडू दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी चेन्नई ते नगरकोइल या वंदे भारत एक्सरप्रेसरला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. तर पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मदुराई ते बंगळुरू या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
पंतप्रधान मोदी २० जूनच्या तमिळनाडू दौऱ्यादरम्यान अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी २० जून रोजी दुपारी चेन्नईला पोहोचण्याची शक्यता आहे. २० जून रोजी पुराची थलाइवर डॉ. एमजी रामचंद्रन चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी चेन्नई ते नगरकोइल या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहेत. चेन्नईतील बेसिन ब्रिज रेल्वे जंक्शनजवळ वंदे भारत मेंटेनन्स डेपो प्रकल्प उभारला जाणार आहे. २० जून रोजी पंतप्रधान मोदी या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. अरल्वनोझी – नागरकोइल आणि मेलाप्पलयम – तिरुनेलनवेली या दुहेरी मार्गाचे देखील पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार आहेत. या मार्गामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तमिळनाडू दौऱ्यादरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
चेन्नईमधील या नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. देशभारत सुरु असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला कमी कालावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांना अत्यंत कमी वेळात त्यांच्या स्थानकावर पोहोचता येते. अगदी कमी काळात वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पंसतीस उतरली आहे.