
छत्तीसगडमधुन मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी दोन प्रवासी बसेस (chhattisgarh naxal attack) पेटवून दिल्या आहेत. या घटनेनं संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एराबोर भागात नक्षलवाद्यांनी दोन बस आणि दोन 22 चाकी ट्रक पेटवून दिला. याशिवाय जागरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पिकअपही नक्षलवाद्यांनी जाळली. दुसरी घटना विजापूर येथे घडली असून नक्षलवाद्यांनी एका मोबाईल टॉवरला लक्ष्य करून तो आपल्या ताब्यात घेतला आहे.
[read_also content=”चेक प्रजासत्ताक मध्ये अमेरिकेसारखी घटना, विद्यापीठाच्या इमारतीत अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/world/10-people-killed-in-shooting-in-central-prague-in-the-czech-republic-nrps-490982.html”]
नक्षलवाद्यांनी 22 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. मात्र त्याआधी ते छत्तीसगडमध्ये एकामागून एक घटना घडवून आणत आहेत. एक दिवस आधी छत्तीसगडमध्ये दोन ट्रक पेटवण्यात आले होते. यानंतर गुरुवारी दोन प्रवासी बसेस जाळण्यात आल्या.
विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन प्रवासी बसेस पेटवून दिल्या आहेत. याला स्वतः विजापूरचे एसपी अंजनेय वार्ष्णेय यांनी दुजोरा दिला आहे. रॉयल ट्रॅव्हल्सची बस नक्षलवाद्यांनी पेटवली. ती अवपल्लीहून रायपूरला जात होती. त्यानंतर वाटेत दुग्गाईगुडाजवळ नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. तसेच कुशवाह ट्रॅव्हल्सची बसही जाळण्यात आली. ही बस जगदलपूरहून बासागुडाकडे जात होती. त्यानंतर वाटेत तिम्मापूरजवळ नक्षलवाद्यांनी हा गुन्हा केला.
नक्षलवाद्यांनी दोन प्रवासी बसेस जाळल्या असल्या तरी. मात्र त्यांनी कोणत्याही प्रवाशाला त्रास न देता प्रथम दोन्ही प्रवासी बसमधून प्रवाशांना खाली उतरवले. यानंतर बसेस जाळण्यात आल्या. छत्तीसगडमध्ये निवडणुकीनंतर या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुकमा जिल्ह्यात बुधवारीही नक्षलवाद्यांनी बस आणि इतर वाहनांना आग लावली.