uddhav thackeray in delhi
नवी दिल्ली : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले असून दिल्लीमध्ये देखील खलबत सुरु आहे. महाविकास आघाडीसह महायुतीची तयारी सुरु आहे. जागावाटप आणि नियोजन यासाठी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली आहे. मागील तीन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये मुक्काम केले असून कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकांबाबत चर्चा केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या जागावाटपांबाबत सल्ला मसलत करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीने उत्कृष्ट केली. त्यानंतर लोकसभा निवडणूकानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्ली दौरा करत आहेत. दिल्लीमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटींचा उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरु होता. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील रणनीती, जागावाटप अशा मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे. तसेच ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचीही भेट घेतली होती. आज (दि.08) सोनिया गांधींचीही उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. या स्रव गाठीभेटीतून महाविकास आघाडीतील जागावाटप, फॉर्मुला ठरवणार जाणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचा पुढचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमधून माध्यमांशी संवाद देखील साधला. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल. मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेन तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा,”अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत अप्रत्यक्षरित्या इच्छा बोलून दाखवली.