
छत्तीसगड मधुन एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडमधील बालोदाबाजार-भाटापारा रस्त्यावर (Chhattisgarh Accident) भीषण अपघात झाला. ट्रक आणि पिकअप यांच्यात झालेल्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला असुन 15 जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.
[read_also content=”‘काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच नाही, पण निवडून आला तर…’; फडणवीसांचं मोठं विधान https://www.navarashtra.com/maharashtra/dy-cm-devendra-fadnavis-said-congress-candidate-will-not-get-elected-in-kasba-bypoll-nrka-371855.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त सगळे जण हे हे सर्व एकाच कुटुंबातील असून ते खिलोरा येथून अर्जुनी गावात कौटुंबिक कामासाठी आले होते. बलोदाबाजारच्या खिलोरा येथील साहू कुटुंबातील सदस्य पिकअपमधून अर्जुनी येथे गेले होते. रात्री उशिरा ते परतत होते. खमारिया येथील डीपीडब्ल्यूएस शाळेजवळ त्यांच्या पिकअपला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा चक्काचूर झाला. या अपघातात ११ जणांनी जीव गमावला तर, 15 जण जखमी झाले. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. अपघात होताच घटनास्थळी एकच गर्दी जमा झाली. यावेळी स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.