
महिंद्राकडून आपल्या मोस्ट अवेटेड स्कॉर्पिओ लाइफस्टायलर पिकअपच्या ३ वेगवेगळ्या डिझाइन थीम सादर करून या गाडीची एक नवी झलक दाखवण्यात आली आहे. ‘रीफ’, ‘ट्रेल’ आणि ‘व्हॅली’ अशा या तीन डिझाइन थीम्स आहेत. या तिन्ही थीमचे मेकॅनिकल इंजिन किंवा फीचर्स वेगळे नसले, तरी वेगवेगळ्या जीवनशैली आणि गरजा असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हे तीन वेगवेगळे लुक डिझाइन केले आहेत.
व्हॅली एडिशन
तिन्ही थीम्सपैकी व्हॅली एडिशन ही जास्त सोबर आणि प्रॅक्टिकल वाटणारी थीम आहे. दररोजचे काम आणि वीकेंडची मौजमजा या दोन्हीचा उत्तम समतोल साधू शकता येईल अशा ग्राहकांसाठी ही डिझाइन खास तयार केली आहे. यात आर्टेमिस ग्रे हा स्पेशल कलर फिनिश मिळतो. ज्या कस्टमर्सना ही गाडी केवळ वीकेंडला फिरण्यासाठी नव्हे, तर रोजच्या दैनंदिन वापरासाठी हवी आहे त्यांच्यासाठी हा पर्याय सर्वात योग्य ठरतो.
रीफ एडिशन
रीफ एडिशन ही लाइफस्टाइल आणि साहसी प्रवासाची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे. स्वातंत्र्य, नवीन ठिकाणांचा शोध आणि निसर्गात वेळ घालवण्याच्या भावनेवर ही थीम आधारित आहे. यात दिलेला अॅक्वारीफ हा सुंदर निळ्या रंगाचा टोन गाडीला अधिक आकर्षक आणि निवांत टाईपचा लुक देतो.
ट्रेल एडिशन
ट्रेल एडिशन ही स्कॉर्पिओच्या रफ अँड टफ ऑफ-रोडिंग अवताराला साजेशी अशी सर्वात डॅशिंग थीम आहे. सहारा बेज रंगात उपलब्ध असलेली ही थीम वाळवंट आणि खडतर वाटांवर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी डिझाइन केली आहे. ऑफ-रोडिंग ट्रॅक असो किंवा शहरातल्या कॅफेबाहेरचे पार्किंग, ही गाडी प्रत्येक ठिकाणी तितकीच रुबाबदार दिसते.
EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात
ग्लोबल प्लॅटफॉर्म आणि भारतात लाँचिंग
महिंद्राने ही गाडी आपल्या नेक्स्ट-जनरेशन बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्मवर तयार केली असून, यात पेलोड क्षमता आणि कम्फर्टचा मेळ घातला आहे. ही गाडी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ‘महिंद्रा लाइफस्टायलर’ या नावाने विकली जाईल. भारतात ही गाडी एप्रिल २०२७ पर्यंत लाँच होणार असून, तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १९.७९ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, असे माहितीवरून कळते आहे.