Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात ‘विहिंप’ आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी

पश्चिम बंगाल मधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवार( ता. २१) जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 21, 2025 | 08:58 PM
पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात ‘विहिंप’ आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर: पश्चिम बंगाल मधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवार( ता. २१) जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्याबाबत निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले.
पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हिंसाराची चौकशी राष्ट्रीय तपासणी संस्था(NIA )कडून करण्यात यावी तसेच पश्चिम बंगाल राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपविण्यात यावी आणि बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांना परत देशाबाहेर पाठवण्यात यावे तसेच भारत आणि बांगलादेश सीमारेषेवर तत्काल कुंपण घालण्यात काम सुरू करण्यात यावे

वरील सर्व मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले  यावेळी  विश्व हिंदू परिषदे महाराष्ट्र समरसतेचे रवींद्रजी साळे , जिल्हा मंत्री शिवाजीराव जाधव सहमंत्री गोपाळ सुरवसे, बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ संगीत, धर्म प्रचार प्रमुख नागेश बागडे महाराज, वालचंद जामदार, प्रवीण कुलकर्णी,वारकरी पालक संघाचे रामकृष्ण वीर महाराज, हिंदू महासभा चे अभयसिंह कुलकर्णी, अनुप देवधर, निलेश लंके,तुकाराम कवठेकर, गणेश महाराज जाधव, तुकाराम खंदाडे ,ओंकार वैद्य, कौस्तुभ देशपांडे, वासुदेव हेगडे आदी उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी

पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले आहे.त्यामुळे पश्चिम बंगालचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने शनिवार ( दि १९ ) मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

Murshidabad Violence: मुर्शिदाबाद हिंसाचाराबाबतची ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
यावेळी विश्व हिंदू परिषदे बजरंग दलाचे मावळ मंत्री सोमनाथ दाभाडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, तालुकामंत्री अमोल पगडे, सहमंत्री आकाश वारुळे, सचिन शेलार, योगेश शेटे, प्रखंड मंत्री बजरंग कांबळे, दर्शन वहिले, भूषण वहिले, अनंता कुडे, अमोल ठोंबरे, किरण आचार्य, योगेश ढोरे, निखिल भांगरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निवेदनात काय? 

या सभेत सोमनाथ दाभाडे, महेंद्र असवले, राजश्री वाकचौरे आदींनी मनोगत व्यक्त करून, बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत.

Murshidabad Violence: मुर्शिदाबादमधील पीडितांची राज्यपालांनी घेतली भेट; ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी झाल्या असून येथील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारबाबत मौन बाळगले आहे, मुस्लिम मतांसाठी ममता बॅनर्जी या लाचार झाल्या आहेत. कायम हिंदू विरोधी भूमिका ममता बॅनर्जी सरकारने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जगणे मुश्किल झाले असून यामुळे ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

Web Title: Vhps movement against atrocities on hindus at pandharpur city about west bengal murshidabad violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 08:58 PM

Topics:  

  • Pandharpur News
  • Vishva Hindu Parishad
  • waqf Act
  • West bengal

संबंधित बातम्या

BJP on West Bengal:  ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?
1

BJP on West Bengal: ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप
2

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात
3

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

VHP on Garba Event 2025 : कपाळावर कुंकू, गोमुत्र आणि आधार कार्ड…; गरबा खेळण्यासाठी नियमावली जाहीर
4

VHP on Garba Event 2025 : कपाळावर कुंकू, गोमुत्र आणि आधार कार्ड…; गरबा खेळण्यासाठी नियमावली जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.