सुप्रीम कोर्ट (फोटो- सुप्रीम कोर्ट वेबसाइट)
नवी दिल्ली: संसदेत नव्याने पारित झालेल्या वक्फ कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे मोठा विरोध होत आहे. या कायद्याला पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहेत. मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे. दरम्यान या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे.
मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान स्वतंत्रपणे चौकशी करण्याची याचिका दाखल करून घेण्यास कोर्टाने नकार देताना दोन्ही वकिलांना त्यांच्या याचिका मागे घेण्याचे आणि चांगल्या याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
पश्चिम बंगालमधील हिंसचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत वकील शशांक शेखर झा यांनी हिंसाचाराची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे असे म्हटले होते. एवढेच नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एनके सिंह यांच्या खंडपीठासमोर पार पडली.
Supreme Court refuses to entertain petitions seeking independent probe into the violence in West Bengal's Murshidabad district during a protests against the Waqf (Amendment) Act, 2025 and asks the two advocates to withdraw their pleas and file better petitions. pic.twitter.com/2AtiqjwbDm
— ANI (@ANI) April 21, 2025
वक्फ कायद्यावरून बंगाल पेटलं
मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले आहे.
मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या हिंसाचारावर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. हिंसाचाराचे लोण आणखी पसरू नये यासाठी मुर्शिदाबाद आणि अन्य काही जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सिव्ही आनंद बोस व राजभवनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत. वेळ पडल्यास या ठिकाणी सीआरपीरफ आणि आरपीएफ दल सुद्धा तैनात केले जाऊ शकते. केंद्र सरकार त्या ठिकाणी संकटात साडपलेल्या लोकांना मदत करत आहे. पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यात उमरपूर-बानिपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. पोलिसांची वाहने पेटवली गेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग देखील जाम केला गेला आहे. पोलिसांच्या वाहनाला आग लावल्याने येथे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.