Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vice President Election 2025: उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी मतदान! कोणाचं पारड जड? जाणून घ्या निवडणुकीची A to Z प्रक्रिया

मंगळवारी १७ व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होत आहे. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते, कोण मतदान करू शकतो जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 08, 2025 | 08:28 PM
Vice President Election 2025: उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी मतदान! कोणाचं पारड जड? जाणून घ्या निवडणुकीची A to Z प्रक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

Vice President Election Process: भारताच्या राष्ट्रपतींनंतर उपराष्ट्रपती हे देशातील दुसरे सर्वोच्च संवैधानिक पद आहे. १७ वे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी ९ सप्टेंबर, मंगळवार रोजी मतदान होणार आहे. एनडीएच्या वतीने सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारीने पी. सुदर्शन रेड्डी मैदानात आहेत. मंगळवारीच मतमोजणीनंतर विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते, कोण मतदान करतो, यासंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेवूया..

मतदान कसे होईल, निकाल कधी लागेल?

यंदा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार आहेत. मतदानासाठी राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी यांना रिटर्निंग ऑफिसर बनवण्यात आले आहे. मतदान संसद भवनातील कमरा नंबर एफ-१०१, वसुधा येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल. मतदान संपल्यानंतर लगेचच, संध्याकाळी ६ वाजता मतमोजणी सुरू होईल आणि निकाल जाहीर केला जाईल.

कोण मतदान करू शकतो?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील राज्यसभा आणि लोकसभा सदस्य मतदान करतात. राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्यही मतदान करण्यास पात्र असतात. १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठीच्या निर्वाचक मंडळात राज्यसभेचे २३३ निर्वाचित सदस्य (सध्या ५ जागा रिक्त), १२ नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे ५४३ निर्वाचित सदस्य (सध्या १ जागा रिक्त) यांचा समावेश आहे. निर्वाचक मंडळात एकूण ७८८ सदस्य आहेत (सध्या ७८१).

हे देखील वाचा: Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना सपा, आपसह ‘या’ पक्षांनी दिला पाठिंबा; आता निवडणूक ठरणार निर्णायक?

उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान कसे केले जाते?

उपराष्ट्रपती निवडणूक ‘आनुपातिक प्रतिनिधित्व’ पद्धतीने होते. यात ‘सिंगल ट्रान्सफरेबल व्होट सिस्टिम’ द्वारे गुप्त मतदान केले जाते. मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असते, ज्यात दोन कॉलम असतात. एका कॉलममध्ये उमेदवारांची नावे हिंदी आणि इंग्रजीत असतात आणि दुसऱ्या कॉलममध्ये मत देण्यासाठी जागा रिकामी असते. मतदारांना त्यांच्या पसंतीनुसार १, २… असे प्राधान्यक्रम नोंदवावे लागतात.

डाक किंवा अन्य प्रकारे मतदान करता येते का?

उपराष्ट्रपती निवडणुकीत याची परवानगी नाही. निर्वाचक मंडळाच्या सदस्यांना स्वतः उपस्थित राहून गुप्त मतदान करावे लागते. मतदान करताना कोणाचीही मदत घेता येत नाही. जर एखादा खासदार ‘प्रिव्हेंटिव्ह डिटेंशन’ मध्ये असेल, तरच तो डाक मतपत्रिकेने मतदान करू शकतो. सध्याच्या निवडणुकीत शेख अब्दुल रशीद (बारामुल्ला) आणि अमृतपाल सिंग (खडूर साहिब) हे दोघे तुरुंगात असल्याने, ते पोस्टल बॅलेटसाठी पात्र आहेत.

मतांची मोजणी कशी होते?

पडलेल्या मतांमधून, सर्वात आधी वैध मते वेगळी केली जातात. त्यानंतर, वैध मतांमधील पहिल्या प्राधान्यक्रमाची मते मोजली जातात. जर एखाद्या उमेदवाराला एकूण वैध मतांच्या ५०% पेक्षा जास्त मते मिळाली तर त्याला विजयी घोषित केले जाते. जर पहिल्या फेरीत कोणालाही बहुमत मिळाले नाही, तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला स्पर्धेतून बाहेर काढले जाते. त्याची मते दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारांना हस्तांतरित केली जातात. जोपर्यंत एखाद्या उमेदवाराला बहुमत मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.

दोघांपैकी कोणाचा वरचष्मा?

जर आपण फक्त संख्याबळाबद्दल बोललो तर एनडीए पुढे असल्याचे दिसून येते. लोकसभेत त्यांचे सुमारे २९३ खासदार आहेत. राज्यसभेत सुमारे १३० खासदार आहेत. तसेच, त्यांना १२ नामांकित सदस्यांचा पाठिंबा आहे. एकूण, एनडीएकडे सुमारे ४३५ खासदार आहेत, तर बहुमतासाठी ३९२ मते आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत, जर क्रॉस व्होटिंग झाले नाही, तर एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी होतील हे निश्चित मानले जाते.

हे देखील वाचा: Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना मिळतोय विरोधी पक्षांकडून चांगला प्रतिसाद; आता ‘या’ पक्षाने दिला पाठिंबा

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण लढवू शकतो?

  • तो भारताचा नागरिक असावा.
  • त्याचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • त्याचे नाव संसदीय निवडणुकीसाठी मतदार यादीत असावे.
  • तो राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा.
  • तो केंद्र, राज्य किंवा कोणत्याही सरकारी पदावर ‘लाभाच्या पदावर’ नसावा.
  • उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २० निर्वाचक आणि २० अनुमोदकांची स्वाक्षरी आवश्यक असते.
  • १५ हजार रुपयांची अनामत रक्कमही जमा करावी लागते.

उपराष्ट्रपतींना किती पगार मिळतो?

उपराष्ट्रपतींना थेट नियमित पगार मिळत नाही. त्यांना राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून वेतन मिळते. २०१८ मध्ये झालेल्या सुधारणेनुसार, उपराष्ट्रपतींना दरमहा ४ लाख रुपये वेतन मिळते. याव्यतिरिक्त, त्यांना अनेक इतर सुविधाही मिळतात.

उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधा

उपराष्ट्रपतींना मोठे आणि सुंदर मोफत निवासस्थान मिळते. याशिवाय, दैनंदिन भत्ता, प्रवासाचा भत्ता, रेल्वे आणि हवाई प्रवास, लँडलाईन फोन, मोबाईल फोन यांसारख्या सुविधाही दिल्या जातात. उपराष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत वैद्यकीय सुविधा मिळतात. त्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास मोठा कर्मचारी वर्ग उपलब्ध असतो, ज्यात खासगी सचिव आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. निवृत्तीनंतर, त्यांना वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते.

Web Title: Vice president election how its done voting process salary benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • C. P. Radhakrishnan
  • indian politics
  • Sudarshan Reddy
  • Vice President Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.