Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Waqf Amendment Bill: “भाजप सरकार हटल्यावर हे वक्फ विधेयक रद्द होईल,” ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून आता राज्यसभेत सादर करण्यात आले आहे. दरम्यान, नवीन सरकार आल्यावर ते रद्द केले जाईल असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 03, 2025 | 06:03 PM
"भाजप सरकार हटल्यावर हे वक्फ विधेयक रद्द होईल, ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा (फोटो सौजन्य-X)

"भाजप सरकार हटल्यावर हे वक्फ विधेयक रद्द होईल, ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

लोकसभेत मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (3 एप्रिल) मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा भाजप सरकार हटवले जाईल तेव्हा हे वक्फ विधेयक रद्द केले जाईल. त्यांनी भाजपवर वक्फ विधेयकाद्वारे देशाचे विभाजन केल्याचा आरोप केला आहे. भाजपवर हल्लाबोल करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “भाजपने देशाचे विभाजन करण्यासाठी वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणले आहे. जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जाईल आणि नवीन सरकार स्थापन होईल, तेव्हा ते रद्द करण्यासाठी (हे) वक्फ विधेयक दुरुस्त केले जाईल.”

“हा बोर्ड जमीन माफिया बोर्ड झाला आहे का? वक्फ बोर्डवरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घणााघात

लोकसभेत तृणमूल काँग्रेसने विधेयकाच्या विरोधात मतदान केले. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ हे राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचे म्हटले आणि संसदेला या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही असा दावा केला. सभागृहात विधेयकावरील चर्चेत भाग घेताना बॅनर्जी म्हणाल्या की, मुस्लिमांना त्यांच्या मालमत्तेवर अधिकार आहे आणि वक्फ मालमत्ता ही मुस्लिम समुदायाची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख आहे.

या विधेयकाला विरोध केला आणि म्हटले की, असे कायदे करण्याचा अधिकार फक्त राज्यांना आहे आणि हे विधेयक पूर्णपणे असंवैधानिक आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने सांगितले की, संवैधानिक तरतुदी संसदेला असे विधेयक मांडण्याचा अधिकार देत नाहीत. ते म्हणाले की, संसदेच्या माध्यमातून राज्य विधिमंडळाच्या अधिकारांवर अशा प्रकारे अतिक्रमण करता येणार नाही. बॅनर्जी म्हणाले की, प्रस्तावित विधेयक सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयांनी विविध प्रकरणांमध्ये घालून दिलेल्या कायद्याच्या सुस्थापित तत्त्वांना नाकारते.

मोदी सरकारने लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर करून घेतले आहे. बुधवारी दुपारी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत ते सादर केले, ज्यावर १२ तास चर्चा झाली. एनडीएच्या खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला, तर विरोधकांनी एकजूट दाखवत तीव्र विरोध व्यक्त केला. तथापि, रात्री उशिरा सभागृहात २८८ एनडीए खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले आणि विधेयक मंजूर झाले. २३२ खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. यानंतर, आता सरकारने गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक आणले आहे, जिथे चर्चा सुरू आहे.

Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकावर अबू आझमींचे म्हणणे तरी काय? पहिली प्रतिक्रिया देत केला NDA सरकारवर हल्लाबोल

Web Title: Waqf amendment bill when bjp government is removed we will cancel waqf bill mamata banerjee big announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • BJP
  • Mamata Banerjee
  • Waqf Amendment Bill

संबंधित बातम्या

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’
1

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
2

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा
3

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
4

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.