
'इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील'; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, “सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मी 1.4 अब्ज भारतीयांना अभिनंदन करतो. स्वातंत्र्यानंतर, सरदार पटेल यांनी 550 हून अधिक संस्थानांना भारतीय संघराज्यात एकत्रित करण्याचे अशक्य वाटणारे काम पूर्ण केले. अशाप्रकारे इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, “आज लाखो लोकांनी एकतेची प्रतिज्ञा घेतली. देशाची एकता मजबूत करणाऱ्या कृतींना प्रोत्साहन देण्याचा आपण संकल्प केला आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाची एकता कमकुवत करणारा कोणताही विचार किंवा कृती सोडून दिली पाहिजे. आपल्या देशासाठी ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण, १.४ अब्ज देशवासी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो, त्याचप्रमाणे एकता दिनाचे महत्त्व आपल्यासाठी प्रेरणा आणि अभिमानाचा क्षण आहे”, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Indira Gandhi: एकीकडे शोक तर दुसरीकडे आनंद; महापुरुषांच्या जयंती अन् पुण्यतिथीचे देशात भिन्न चित्र
तसेच एकता नगरमध्ये, एकता मॉल आणि एकता गार्डनमध्ये एकतेचा धागा मजबूत करताना दिसतात. देशभरात सुरू असलेल्या रन फॉर युनिटी, लाखो भारतीयांचा उत्साह, आपण एका नवीन भारताचा संकल्प पाहत आहोत, असे
इतिहास घडवण्यासाठी घेतले पाहिजेत कठोर परिश्रम
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘काल संध्याकाळी झालेल्या अद्भुत सादरीकरणासह येथे घडलेल्या घटना भूतकाळातील परंपरा, वर्तमानातील कठोर परिश्रम आणि शौर्य आणि भविष्यातील कामगिरीची झलक दर्शवतात. सरदार पटेलांचा असा विश्वास होता की, इतिहास लिहिण्यात वेळ वाया घालवू नये; आपण इतिहास घडवण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. त्यांच्या चरित्रात ही भावना प्रतिबिंबित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतलेल्या धोरणांनी आणि निर्णयांनी नवा इतिहास घडवला’.
हेदेखील वाचा : Indira Gandhi Death Anniversary: अंगरक्षकानेच केली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या; जाणून घ्या 31 ऑक्टोबरचा इतिहास