
BJP is likely to suffer a setback in the Nanded-Waghala municipal elections
Nanded Politics : नांदेड : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊतील सत्ता समीकरणे भाजपासाठी अधिकच गुंतागुंतीची होत चालली आहेत. पक्षश्रेष्ठी विविध राजकीय डावपेच रचत असले तरी प्रत्यक्ष मैदानात कार्यकर्त्यांची नाराजी, विस्कळित संघटन आणि तिकीट वाटपातील वाद यामुळे भाजपाचे आव्हान वाढले आहे. त्यामुळे प्रभाग नऊमध्ये भाजपाचे पक्षश्रेष्ठीच भीतीच्या सावटाखाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या प्रभागात भाजपाला सर्वात मोठा फटका पॅनलची योग्य रचना न झाल्यामुळे बसल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक व राजकीय समतोल साधणारी पॅनल उभी करता आली नसल्याची खंत खुद्द पक्षातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. उमेदवार निवडताना स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून पक्षाशी फारसा संबंध नसलेल्या व्यक्तींना तिकीट दिल्याचा आरोप होत असून, त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये य असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या त नाराजीच्या केंद्रस्थानी माजी स्थायी समिती य सभापती किशोर स्वामी यांचे नाव घेतले जात त आहे. त्यांच्या हट्टामुळेच पक्षाला ही निवडणूक जड जात असल्याची टीका अंतर्गत पातळीवर होत आहे. मागील आठ वी वर्षात प्रभागात अपेक्षित विकासकामे न त झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, निकृष्ट दर्जाचे रस्ते, उखडलेले डांबरीकरण आणि अपुऱ्या नागरी सुविधांमुळे प नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
हे देखील वाचा : भाजपच्या निशाण्यावर आले महेश मांजरेकर; ठाकरे बंधूंची मुलाखत घेताच राजकारण न पडण्याचा सल्ला
प्रभागात कौटुंबिक राजकारणाचा आरोप
प्रभाग नऊ हा शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांनी गजबजलेला परिसर आहे. अशा ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, स्वच्छता व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांवर भर देणे अपेक्षित होते. सातत्याने दुर्लक्ष झाल्याने भाजपाविरोधात नकारात्मक वातावरण तयार झाल्याचे जाणकारांचे मत आहे. यातच किशोर स्वामी यांच्या पत्नी प्रभाग चारमधून निवडणूक लढवत असल्याने एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना भाजपाने तिकीट दिल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. तसेच प्रभाग नऊतील भाजपाचे उमेदवार बलवंतसिंघ गाडीवाले यांच्या चिरंजीवांना प्रभाग दहामधून उमेदवारी देण्यात आल्याने ‘कौटुंबिक राजकारणाचा आरोप होत आहे. लोहा नगरपरिषद निवडणुकीत अशाच प्रकारे एका घरातील अनेकांना उमेदवारीने नाराजीचा स्फोट झाला होता.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षे का लागली? राज-उद्धव यांची बेधडक संयुक्त मुलाखत चर्चेत
धुसफूस उघड, निकालावर परिणाम होण्याची चिन्हे
प्रभाग नऊतील भाजपाचे संघटन पूर्णतः विस्कळित झाल्याचे स्पष्ट दिसत असून, काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांऐवजी नव्या चेहऱ्याऱ्यांना अचानक संधी दिल्याने धुसफूस उघड झाली आहे. याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही ‘महाचूक’ भाजपाला महागात पडण्याची चिन्हे दिसून येत असून स्वामींचा ‘राजहट्ट’ भाजपाची नौका बुडविण्यास कारणीभूत ठरतो की काय? अशी भीती व्यक्त केल्या जात आहे.