Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजधानी दिल्लीतही बाप्पाचे उत्साहाने स्वागत! महाराष्ट्र सदनासह ३८ मराठी गणेशोत्सव मंडळात गणरायाचे आगमन

आज लाडक्या गणरायाचे आगमन सर्वत्र धुमधडाक्यात झाले. राजधानी दिल्लीमध्येही महाराष्ट्र सदनासह ३८ गणेशमंडळांकडून बाप्पाचे ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पुढील १० दिवसात दिल्लीतही भक्तीमय वातावरण असणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 07, 2024 | 08:40 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मराठी माणूस जगात कुठेही असला तरी आराध्यदेव गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा करतोच. राजधानी दिल्लीमध्येही असाच गणेशोत्सवाचा कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने दिल्लीतील मराठी माणसाचे केंद्र महाराष्ट्र सदन आज दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी  सर्व गणेशभक्तांनी  एकच गर्दी केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय  वातावरण संपूर्ण दिल्ली व  राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने  महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात आज  गणरायाची  प्रतिष्ठापना करण्यात आली.

हे देखील वाचा-

महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी केली गणरायाची पूजा

अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर विशेषत: राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात  महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व  कर्मचारी, गणेशभक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.तत्पुर्वी आज सकाळी येथील कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ या घोषणा, ढोल ताशांचा गजरामुळे संपूर्ण वातावरण बाप्पामय  झाले.मिरवणुकीनंतर शासकीय पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

हे देखील वाचा- बाप्पांच्या आगमानाने बाजारात येणार नवचैतन्य, होणार तब्बल 25 हजार कोटींची उलाढाल

दिल्लीतील ३८ गणेशोत्सव मंडळात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३८ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.  मराठी भाषिकांच्या उत्साहाला उधाण आले होते.

गणेशोत्सव काळात कार्यक्रमांची रेलचेल

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिल्ली व नजीकच्या परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या मराठमोळी लावणी आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान करण्यात  आले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी  गणेशभक्तही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभागी होतात. यामुळे दिल्लीमध्ये पुढील १० दिवस उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरण असणार आहे.

Web Title: Welcome bappa enthusiastically even in the capital delhi arrival of ganaraya in 38 marathi ganeshotsav mandal with maharashtra sadan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 08:40 PM

Topics:  

  • delhi
  • Ganesh Chaturthi 2025

संबंधित बातम्या

1934 पासून 90 वेळा बदलण्यात आली आहे लालबागच्या राजाची मूर्ती; एका मिनिटांत पहा संपूर्ण प्रवास; Video Viral
1

1934 पासून 90 वेळा बदलण्यात आली आहे लालबागच्या राजाची मूर्ती; एका मिनिटांत पहा संपूर्ण प्रवास; Video Viral

Anant Chaturdashi 2025: बाप्पाच्या विसर्जनानंतर मागे वळून का पाहू नये, जाणून घ्या यामागील कारणे
2

Anant Chaturdashi 2025: बाप्पाच्या विसर्जनानंतर मागे वळून का पाहू नये, जाणून घ्या यामागील कारणे

हृदय एकच आहे, किती वेळा जिंकणार रोहित… हिटमॅनने हात जोडून चाहत्यांना का गप्प केले? Video Viral
3

हृदय एकच आहे, किती वेळा जिंकणार रोहित… हिटमॅनने हात जोडून चाहत्यांना का गप्प केले? Video Viral

भारताच्या या मंदिरात स्वयं प्रकट झाले होते भगवान गणेश; काय आहे उलट्या स्वस्तिकाची परंपरा, जाणून घ्या
4

भारताच्या या मंदिरात स्वयं प्रकट झाले होते भगवान गणेश; काय आहे उलट्या स्वस्तिकाची परंपरा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.