
संसदेच्या सभागृहात जय हिंद, वंदे मातरंम म्हणण्यास बंदी
सचिवालयाच्या नियमावर ममता बॅनर्जी भडकल्या
एसआयआर वरून केंद्र सरकारवर टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यसभा सचिवाललयाने काढलेल्या नियमावरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे आणि ममता बॅनर्जी नेमक्या काय म्हणाल्या, ते आपण जाणून घेऊयात. मात्र यावरून आता राजकारण तपण्याची शक्यता आहे.
राज्यसभा सचिवालयाने सभागृहात घोषणा देण्यास बंदी केली असल्याचे समोर येत आहे. यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आहेत. त्यांनी यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, आपण सभागृहात जय हिंद, वंदे मातरम का म्हणू शकत नाही? हे आमचे स्वातंत्र्य आणि नेतोजी सुभाष चंद्र बोस यांचा नारा आहे. जो कोणी या भावनेला विरोध करेल, त्याचे तुकडे तुकडे होतील.”
संसदेत राष्ट्रगीत आणि धन्यवाद अशा घोषण देण्यावर बंदी घालणे ही गोष्ट समजण्यापलीकडे आहे. राज्यसभा सचिवालयाने नुकतेच सभागृहात घोषणाबाजी बंद करणारे एक बुलेटीन काढल्याचे समोर आले आहे. हा देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रतिकावर हल्ला आहे. या घोषणा देण्यात अंकी चूक आहे? या केवळ घोषणा नसून देशाच्या अस्मितेशी जोडलेले शब्द आहेत, असे भाष्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा
एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जीयांनी भाजपवर टीका केली आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास तर संपूर्ण भारताला हादरवून टाकतील असा इशारा त्यांनी दिला आहे. हेलिकॉप्टरला परवानगी न देणे आणि एसआयआरवरून त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायची होती. मात्र त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे अचानक समजले. हा माझ्याविरुद्धचा कट असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. मला तुमचा प्लॅन समजला आहे, त्यामुळे तुम्ही मला हात देखील लावू शकत नाही. निवडणूक होण्याआधी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला , तरी मी झुकणार नाही, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा
SIR वरून निशाणा
एसआयअर केवळ एक बहाणा आहे. मागच्या दाराने एनआरसी लागू करण्याचा त्यांचा कट आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी बीएसएफवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घुसखोर बंगालमध्ये असतील तर ते आत कसे आले आणि त्यांना कोणी येऊ दिले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या विधानानंतर टीएमसीने स्पष्टीकरण दिले पाहिजे. टीएमसी पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यावरील हला सहन केला जाणार नाही असे त्याचा अर्थ असल्याचे स्पष्ट केले गेले.