शेखर गोतसुर्वे, सोलापूर : कर्नाटक विधानसभा निवडणूकीत अभुतपुर्व बाजी मारलेल्या काँग्रेस पक्षानी यश संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री निवड प्रक्रियेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना कर्नाटकातील बेंगलोर येथे तात्काळ बोलवण्यात आले आहे.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे तातडीने सोलापुरातून बेंगलोरला रवाना झाले आहेत. दिल्लीवरून काँग्रेस हायकमांडने सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी सोलापूरला स्पेशल चार्टर विमान पाठवले त्यातून ते बेंगलोरला गेले आहेत. यावरून कर्नाटक राज्यात सत्ता स्थापनेत सुशीलकुमार शिंदे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
शनिवारी कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला. काँग्रेसने या ठिकाणी 224 पैकी तब्बल 136 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असल्याने आता सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष असून मुख्यमंत्री कोण होणार? याकडे आहे.निवडून आलेल्या सर्व उमेदवारांची बैठक बेंगलोर येथे आयोजित केली असून सुशीलकुमार शिंदे हे निरीक्षक म्हणून सर्व नूतन विधानसभा सदस्यांचे म्हणणे ऐकून घेऊन, विचारविनियम करून पक्षश्रेष्ठीना अहवाल देणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे हे ही बेंगलोर ला गेले आहेत.
यावेळी विमानतलाळावर प्रकाश तात्या पाटील(तुंगत), सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, पृथ्वीराज नरोटे, रूपेश गायकवाड़, सातलिंग शटगार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.