Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिपू सुलतानाने 800 ब्राह्मणांना का  मारले ; जाणून घ्या  इतिहासात उल्लेख नसलेली मोठी घटना

29 मार्च रोजी, निवडणूक आयोगाने (Election commission of India )कर्नाटक निवडणुकीची (Karnataka Election)तारीख जाहीर केली, त्याआधीच भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या विधानांनी हे स्पष्ट केले की निवडणुकीत टिपू सुलतान हा प्रमुख मुद्दा असेल. काँग्रेस म्हैसूरचा शासक टिपू सुलतानला (Tipu Sultan) देशभक्त म्हणत आहे तर भाजप त्यांना हिंदुविरोधी म्हणत आहे.

  • By Aparna
Updated On: Apr 24, 2023 | 03:22 PM
Shiv Sena should also celebrate Aurangzeb's birthday; BJP tola over decision to celebrate Tipu Sultan's birthday

Shiv Sena should also celebrate Aurangzeb's birthday; BJP tola over decision to celebrate Tipu Sultan's birthday

Follow Us
Close
Follow Us:
29 मार्च रोजी, निवडणूक आयोगाने (Election commission of India )कर्नाटक निवडणुकीची (Karnataka Election)तारीख जाहीर केली, त्याआधीच भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या विधानांनी हे स्पष्ट केले की निवडणुकीत टिपू सुलतान हा प्रमुख मुद्दा असेल. काँग्रेस म्हैसूरचा शासक टिपू सुलतानला (Tipu Sultan) देशभक्त म्हणत आहे तर भाजप त्यांना हिंदुविरोधी म्हणत आहे.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी निकाल येणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, एक धक्कादायक माहिती येथील नागरिक सांगत आहेत.  मेलकोट शहरात  टिपू सुलतानच्या सैनिकांनी सुमारे 800 हिंदूंना ठार मारल्याचा दावा ते करत आहेत. हे सर्व अय्यंगार ब्राह्मण आहेत.
ते सांगतात, नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच छोटी दिवाळीच्या दिवशी हा हल्ला झाला, तेव्हापासून मेळकोटचे अय्यंगार ब्राह्मण दिवाळी साजरी करत नाहीत. देशात दिवाळी साजरी होत असताना  ते पितरांचे श्राद्ध करतात. मात्र, या समाजातील काही कुटुंबांनी आता दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे.
सध्याची परिस्थिती 
बंगलोरपासून मेलकोट १३३ किमी आहे. अय्यंगार समाजाची मोजकीच घरे उरली आहेत. जे आहेत, ते योग नरसिंह मंदिर आणि चेलुवनारायण मंदिराची देखरेख आणि पूजा करतात. मेळकोट येथे राहणारे श्री हरी सांगतात,  230 वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडात त्यांचे पूर्वजही मारले गेले होते. श्री हरीचे वय सुमारे 30 वर्षे आहे. ते त्यांच्या पूर्वजांसारखे पांढरे सुती धोतर घालतात आणि वैष्णवांसारखे टिळा लावतात.
धर्माचा प्रसार करत होते, म्हणून ब्राह्मणांना मारले: श्री हरी
230 वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशी जे घडले त्यावर श्री हरी म्हणतात, ‘हा इतिहास आहे आणि तो इतिहास अज्ञात आहे. आमच्या समाजातील लोक राणी लक्ष्मी अम्मानीच्या संपर्कात असल्याचा संशय टिपू सुलतानला होता. टिपू हा कट्टर मुस्लिम होता. इतका कट्टर की तो भारताबाहेरील मुस्लिम राजांना पत्र लिहून त्यांना भारतावर हल्ला करण्यास सांगत असे. इस्लामचा प्रसार करणे हा त्याचा उद्देश होता. आपल्या भावी पिढीने आपल्यासारखे राज्य करावे अशी त्याची इच्छा होती. हिंदूंच्या पाठिंब्याशिवाय तो हे सर्व करू शकला नसता, म्हणून त्यांनी हिंदूंनाही गुंतवून ठेवले होते आणि या गोष्टी मी माझ्या मनातून सांगत नाही, हे सर्व लिहिले आहे, असे श्री हरी सांगतात.
‘1790 च्या दशकात आमच्या आधीच्या पिढीचे हत्याकांड झाले. त्यासाठी नरक चतुर्दशीचा दिवस निवडण्यात आला. त्याने यापूर्वीही मेळकोट येथे हत्याकांड केले होते. नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीरंगपट्टणातील नरसिंह मंदिरासमोर शेकडो हिंदूंची हत्या करण्यात आली. ब्राह्मण हे त्यांचे लक्ष्य होते, कारण ते धर्माचा सर्वाधिक प्रचार करत होते.एकूण किती लोक मारले गेले याचा नेमका आकडा कोणाकडेही नाही. त्या हल्ल्यात महिला आणि लहान मुले होती की नाही याचीही माहिती नाही.
‘या हत्याकांडानंतर हिंदू कुटुंबे पळून गेली होती. काही काशीला स्थायिक झाले. काही बंगाल-मद्रासला गेले. आता या हत्याकांडाचे दोन परिणाम आहेत. सर्वप्रथम, प्रत्येकाला योग्य इतिहास माहित आहे हे चांगले आहे, कारण आम्हाला या गोष्टी पुस्तकांमध्ये सांगण्यात आल्या नाहीत.दरवर्षी निवडणुकीच्या वेळी किंवा दिवाळीच्या आसपास मीडियाचे लोक येतात आणि आम्हाला त्या घटनेबद्दल विचारले जाते.आम्ही जे घडले ते सांगतो. योग्य  इतिहास सांगितला  पाहिजे असे वाटते, पण जातीय तेढ निर्माण करणारे काहीही करणे योग्य नाही, असेही ते म्हणतात
जालियनवाला बाग हत्याकांड सारख्या आमच्या पूर्वजांना मारले: रामानुजम
 मेलकोटे येथील अय्यंगार ब्राह्मण समाजातील रामानुजम सांगतात, ‘त्यावेळी येथे केवळ वैष्णव भक्तच राहत असत. आपले पूर्वज ज्या प्रकारे घरात सण साजरे करायचे, त्यापेक्षा मोठा सण मंदिरात साजरा करायचे. त्यावेळी मंदिरात उत्सव सुरू होता. पूजा होत होती. मग टिपू सुलतानच्या सैनिकांनी सर्वांना एका ठिकाणी एकत्र केले आणि त्यांना मारण्यास सुरुवात केली. जे वाचले त्यांना जिवंत जाळण्यात आले. हे जालियनवाला बाग हत्याकांड सारखेच होते.हिंदूंचा नाश करणे हा त्यांचा उद्देश होता. त्या लोकांनी मंदिरे लुटली, तोडली. तो दिवाळीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता, कारण त्या दिवशी समाजातील लोक जमायचे.
आता गावात फक्त 400 अय्यंगार आहेत, टिपूबद्दल कोणी बोलत नाहीत
येथील गावातील अय्यंगार ब्राह्मण समाजातील लोक टिपूबद्दल बोलत नाहीत. गावात या समाजाचे जेमतेम 400 लोक आहेत. काही लोकांनी विनाकारण वादात पडायचे नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.  मीडियावाले निघून जातात, पण नंतर तणाव निर्माण होतो. येथे प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व असल्याने सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे ते सांगतात
टिपूचे दोन चेहरे, एक अतिशय भितीदायक…
श्री अदांडा सी. करिअप्पा, इतिहासकार आणि रंगायण, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या थिएटर इन्स्टिट्यूटचे संचालक, म्हणतात, “टिपू सुलतानचे दोन चेहरे होते, त्यापैकी एक अतिशय भितीदायक होता. मेलकोट आणि कोडगू येथे मोठा रक्तपात झाला. मेलकोटचे अय्यंगार ब्राह्मण राणी लक्ष्मी अम्मानीशी एकनिष्ठ होते. म्हणूनच टिपूने 1700 ब्राह्मणांना विष देऊन मारले. हे सर्व मांडयम ब्राह्मण होते. अय्यंगारमध्येही  नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांची हत्या करून त्यांना झाडावर टांगण्यात आले.
अय्यंगार ब्राह्मण आणि संस्कृत विद्वान एमए अलवार या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्या मते, ‘टिपू सुलतान एक महत्त्वाकांक्षी शासक होता आणि राज्य वाढवण्यासाठी लोकांची हत्या करण्यास मागेपुढे पाहत नव्हता. मेलकोटमध्ये मरण पावलेले अय्यंगार ब्राह्मण होते, पण कुर्गमध्ये त्यांनी मुस्लिमांनाही सोडले नाही. त्याने हिंदूंची हत्याही केली आणि रंगनाथन स्वामी मंदिरालाही मोठी देणगी दिली. मंदिरात असलेली घंटा आणि ढोल आजही याचे साक्षीदार आहेत.कर्नाटक पर्यटन मंडळाचा हा फलक योग नरसिंह मंदिराच्या बाहेर लावण्यात आला आहे, ज्यामध्ये मंदिरात ठेवलेला ड्रम टिपू सुलतानने भेट दिल्याचे लिहिले आहे.

Web Title: Why did tipu sultan kill 800 brahmins know about the histrory not mentioned in history nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2023 | 03:22 PM

Topics:  

  • BJP
  • election commission of india
  • Karnataka
  • Karnataka Election

संबंधित बातम्या

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल
1

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले
2

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
3

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
4

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.