Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार स्नेहा दुबे यांना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये डावलले

भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक तथा गटनेता अशोक शेळके यांच्या कार्यालयाच्या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय बनली असून पक्षांतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 04, 2026 | 04:52 PM
सांगलीत 'ऑपरेशन लोटस' टाळण्यासाठी आघाडीने केली 'अशी' खेळी; जिल्हा परिषदेच्या 36 सदस्यांना...

सांगलीत 'ऑपरेशन लोटस' टाळण्यासाठी आघाडीने केली 'अशी' खेळी; जिल्हा परिषदेच्या 36 सदस्यांना...

Follow Us
Follow Us:

भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक तथा गटनेता अशोक शेळके यांच्या कार्यालयाच्या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय बनली असून पक्षांतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे. वसई विधानसभा क्षेत्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपच्या स्थानिक आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे नाव प्रमुख उपस्थित म्हणून नसणे,  हे अनेकांना खटकले आहे. त्यातच भर म्हणजे भाजपच्याच गटनेत्यांनी आवर्जून नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन नाईक यांचे नाव पत्रिकेत समाविष्ट केले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या याच कृतीने स्थानिक पातळीवर प्रश्नांचे मोहोळ उठवले आहे. रज्या विधानसभा क्षेत्रात कार्यक्रम, त्याच क्षेत्राच्या भाजप आमदारांना डावलायचे आणि दुसऱ्या मतदारसंघाच्या आमदाराला प्राधान्य द्यायचेर ही भूमिका पक्षशिस्तीच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे, असा सवाल आता भाजप कार्यकर्त्यांमधूनच उपस्थित केला जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, ही केवळ निमंत्रण पत्रिकेतील चूक नसून भाजपमधील गटबाजीचे हे एक उघड प्रतीक असू शकते. भाजप आमदार स्नेहा दुबे यांचे नाव वगळण्यामागे नेमकी काय कारणे आहेत. याबाबत अद्याप कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. मात्र, बंद दाराआड होणारी कुजबुज आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. भारतीय जनता पार्टीसारख्या शिस्तबद्ध पक्षात अशा प्रकारची उघड दुफळी पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारी असल्याचे जाणकार सांगतात. येणारा काळच सांगेल की हे मतभेद भाजपच्या एकजुटीवर किती परिणाम करतात. मात्र तूर्तास तरी या निमंत्रण पत्रिकेने वसई विधानसभा क्षेत्रातील भाजपचे राजकारण ढवळून काढले आहे.

यावर आमदार राजन नाईक यांनी प्रतिक्रीया देत सारवासारव केली असली तरी नाईक कोणतेही ठोस कारण देऊ शकले नाहीत. त्यामुळे याप्रकराला नाईकांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा असावा, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. तर शेळके यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

अशोक शेळके वसई विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र, भाजपने स्नेहा दुबेंना उमेदवारी दिली होती. स्नेहा दुबे विजयी झाल्यावर अशोक शेळके यांनी दिलेल्या मुलाखतीत दुबे यांच्याविरोधात टिपण्णी केली होती. तेव्हापासून दोघांमधील अंतर्गत वाद निर्माण झाला होता. आतातर शेळके यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला स्थानिक आमदार दुबे यांच्याऐवजी आमदार राजन नाईक यांना बोलवल्याने दोघांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Internal factionalism in bjp on the rise mla sneha dubey was left out of the party office inauguration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • BJP
  • palghar
  • Vasai-Virar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.