Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: बजेटपूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’? १० दिवस का ‘कैदेत’ असतात अधिकारी? जाणून घ्या रंजक परंपरा

Halwa Ceremony Importance: १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री संसदेत बजेट मांडतील. मात्र, त्यापूर्वी अर्थमंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा पाळली जाते, ती म्हणजे 'हलवा सेरेमनी'.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 14, 2026 | 09:01 PM
बजेटपूर्वी का साजरी केली जाते 'हलवा सेरेमनी'? १० दिवस का 'कैदेत' असतात अधिकारी? (Photo Credit- X)

बजेटपूर्वी का साजरी केली जाते 'हलवा सेरेमनी'? १० दिवस का 'कैदेत' असतात अधिकारी? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • अर्थसंकल्पापूर्वी सरकार ‘हलवा सेरेमनी’ का साजरी करते?
  • अधिकारी होतात १० दिवस ‘नजरकैद’!
  • जाणून घ्या या रंजक परंपरेचा इतिहास आणि महत्त्व
What is Halwa Ceremony: देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री संसदेत बजेट मांडतील. मात्र, त्यापूर्वी अर्थमंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा पाळली जाते, ती म्हणजे ‘हलवा सेरेमनी’ (Halwa Ceremony). ही केवळ एक गोड मेजवानी नसून अर्थसंकल्पाच्या अत्यंत गोपनीय प्रक्रियेची ही अधिकृत सुरुवात असते.

काय असते ‘हलवा सेरेमनी’?

बजेटला अंतिम स्वरूप दिल्यानंतर आणि त्याची प्रत्यक्ष छपाई किंवा डिजिटल फीडिंग सुरू होण्यापूर्वी दिल्लीतील अर्थमंत्रालयाच्या मुख्यालयात (नॉर्थ ब्लॉक) एका मोठ्या कढईत हलवा बनवला जातो. अर्थमंत्री स्वतः हा हलवा ढवळून या कार्यक्रमाची सुरुवात करतात आणि मंत्रालयातील सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांना तो स्वहस्ते वाढतात. या कार्यक्रमाला बजेटच्या ‘लॉक-इन’ (Lock-in) प्रक्रियेची सुरुवात मानले जाते.

‘शुभ कामाची सुरुवात गोडाने’

भारतीय संस्कृतीत कोणत्याही मोठ्या आणि शुभ कामाची सुरुवात ‘गोड’ खाऊन करण्याची परंपरा आहे. याच विचारातून दशकांपूर्वी या सेरेमनीला सुरुवात झाली. ही परंपरा केवळ गोड खाण्यापुरती मर्यादित नसून, रात्रंदिवस बजेट तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या निष्ठेचा सन्मान करण्याचा हा एक मार्ग आहे.

अधिकारी होतात १० दिवस ‘नजरकैद’!

हलवा वाटपाचा कार्यक्रम संपला की, बजेट छपाई आणि डेटा एन्ट्रीशी संबंधित १०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये असलेल्या प्रेसमध्ये जातात. तिथून पुढचे १० दिवस हे अधिकारी बाहेरील जगासाठी ‘अदृश्य’ होतात. जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्पाचे भाषण पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत हे अधिकारी आपल्या कुटुंबाला भेटू शकत नाहीत किंवा फोनवर बोलू शकत नाहीत.

Union Budget 2026 : 1 फेब्रुवारीची संसदेची सुटी रद्द; बजेट रविवारीच, परंपरा कायम

कडक सुरक्षा व्यवस्था

इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे अधिकारी या बेसमेंटवर २४ तास पहारा देतात. तिथे फक्त एक लँडलाईन फोन असतो, ज्यावर केवळ बाहेरून फोन येऊ शकतो, पण आतून बाहेर फोन करता येत नाही. या सर्व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था त्याच बेसमेंटमध्ये केली जाते, जेणेकरून बजेटची कोणतीही माहिती बाहेर फुटणार नाही.

डिजिटल युगातही परंपरा कायम

२०२१ पासून भारताचा अर्थसंकल्प ‘पेपरलेस’ झाला आहे. आता बजेटच्या हजारो प्रती छापण्याऐवजी ते डिजिटल स्वरूपात मांडले जाते. मात्र, छपाईचे काम कमी झाले असले तरी डेटा फीडिंग आणि गोपनीयता जपण्यासाठी आजही ‘हलवा सेरेमनी’ आणि ‘नजरकैदेची’ ही परंपरा तितक्याच काटेकोरपणे पाळली जाते.

यंदा कधी होणार ही सेरेमनी?

१ फेब्रुवारी २०२६ रोजी बजेट सादर होणार असल्याने, यंदाची हलवा सेरेमनी २० ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडण्याची शक्यता आहे. या सोहळ्यानंतरच अर्थसंकल्पाचे काम करणारे सर्व महत्त्वाचे अधिकारी १० दिवसांसाठी बाहेरील जगापासून पूर्णपणे संपर्क तोडून ‘अंडरग्राउंड’ होतील.

झालं क्लिअर ! रविवारीच सादर केला जाणार केंद्रीय अर्थसंकल्प; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मान्यता

Web Title: Why is budget halwa ceremony celebrated history lock in period of officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • FM Nirmala Sitharaman
  • Nation News
  • union budget

संबंधित बातम्या

Union Budget 2026 : 1 फेब्रुवारीची संसदेची सुटी रद्द; बजेट रविवारीच, परंपरा कायम
1

Union Budget 2026 : 1 फेब्रुवारीची संसदेची सुटी रद्द; बजेट रविवारीच, परंपरा कायम

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…
2

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

झालं क्लिअर ! रविवारीच सादर केला जाणार केंद्रीय अर्थसंकल्प; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मान्यता
3

झालं क्लिअर ! रविवारीच सादर केला जाणार केंद्रीय अर्थसंकल्प; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.