Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान

Amit Shah : हरियाणातील करनाल येथे अमित शाह यांनी राहुल गांधींना संसदेत चर्चेचे थेट आव्हान दिले. एसआयआर प्रक्रियेवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 05, 2026 | 05:21 PM
Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान

Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधी पराभवाने बिथरल्याची टीका
  • संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चेस तयार
  • घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार
 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुरुवारी हरियाणातील करनाल येथे काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेच्या समारोपप्रसंगी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना थेट आव्हान दिले. संसदेत चर्चा करण्याऐवजी गोंधळ आणि बहिष्काराचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, एसआयआर प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास भाजप तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी पराभवाने बिथरले

अमित शाह म्हणाले की, 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत देशभरातील भाजपच्या प्रमुख कार्यालयांमध्ये ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियान राबवण्यात आले. या अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

2024 मध्ये नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला, तर दिल्ली, आसाम आणि इतर ठिकाणी भाजपने विजय मिळवला, असा दावा शाह यांनी केला.

राहुल गांधी पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडत असल्याची टीकाही त्यांनी केली. 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी एसआयआर प्रक्रिया नव्हती, मग पराभवाचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चेस तयार

लोकशाहीमध्ये संसद हे चर्चेचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. मात्र, राहुल गांधी संसद चालू देत नाहीत. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी गोंधळ आणि बहिष्काराचे राजकारण केले जाते, असा आरोप अमित शाह यांनी केला.

ते म्हणाले, राहुल गांधींना चर्चेची एवढीच इच्छा असेल, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावे. एसआयआर प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी आम्ही संसदेचे विशेष अधिवेशनात चर्चेस तयार आहोत. रस्त्यावर चर्चा करण्याची इच्छा असल्यास हरियाणातील कोणतेही ठिकाण निश्चित करावे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष चर्चेसाठी येतील, असे आव्हानही शाह यांनी दिले.

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण

घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार

एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस विरोध करत असल्याचा आरोप करत अमित शाह यांनी घुसखोरांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. काँग्रेसची रॅली मतदारांचे मत वाचवण्यासाठी नसून घुसखोरांना वाचवण्यासाठी असल्याची टीका त्यांनी केली.

भाजप घुसखोरांना शोधून त्यांची नावे मतदार यादीतून वगळेल आणि त्यानंतर त्यांना देशाबाहेर काढण्याची कारवाई करेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात

राहुल गांधींच्या नेतृत्वावरही निशाणा

अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केले. 2007 मध्ये राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस झाले, तेव्हा पक्षाकडे 1200 आमदार होते. त्यानंतर ते उपाध्यक्ष आणि अध्यक्ष झाल्यानंतर आमदारांची संख्या कमी होत गेली, असा दावा शाह यांनी केला.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची राजकीय ताकद कमी होत असल्याचा आरोप करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार आणि खासदार वाढत असल्याचेही ते म्हणाले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमित शाह यांनी राहुल गांधींना कोणते आव्हान दिले?

    Ans: एसआयआर प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावे. चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यास भाजप तयार असल्याचे अमित शाह यांनी म्हटले.

  • Que: अमित शाह यांनी राहुल गांधींवर कोणते आरोप केले?

    Ans: निवडणुकांमधील पराभवाचे खापर राहुल गांधी निवडणूक आयोगावर फोडत असल्याचा आणि संसदेत चर्चेऐवजी गोंधळ घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • Que: एसआयआर प्रक्रियेबाबत भाजपची भूमिका काय आहे?

    Ans: घुसखोरांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी एसआयआर प्रक्रियेचे समर्थन करत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

Web Title: Amit shah challenges rahul gandhi parliament sir debate rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • SIR

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi: राहुल गांधींना ‘पगलू’ म्हटल्यावर ओवैसींचं भन्नाट उत्तर; म्हणाले, ‘मी आणि बीवी पगलू…’
1

Asaduddin Owaisi: राहुल गांधींना ‘पगलू’ म्हटल्यावर ओवैसींचं भन्नाट उत्तर; म्हणाले, ‘मी आणि बीवी पगलू…’

Rahul Gandhi on Gokul Milk Politics: गोकुळच्या राजकारणात राहुल गांधींची एंट्री; भाजपला थेट इशारा, शेतकरी विसरणार नाहीत…
2

Rahul Gandhi on Gokul Milk Politics: गोकुळच्या राजकारणात राहुल गांधींची एंट्री; भाजपला थेट इशारा, शेतकरी विसरणार नाहीत…

Ramdas Athawale : सरकार चर्चेला तयार आहे, राहुल गांधींनी संसदेत यावे; रामदास आठवलेंचं खुलं आव्हान
3

Ramdas Athawale : सरकार चर्चेला तयार आहे, राहुल गांधींनी संसदेत यावे; रामदास आठवलेंचं खुलं आव्हान

‘देशाला मोदीजी हवे आहेत’, CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं!
4

‘देशाला मोदीजी हवे आहेत’, CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.