Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमान का पाडलं गेलं, यापेक्षा महत्त्वाचं आहे का आणि कसं पडलं”? CDSअनिल चौहानांची अप्रत्यक्ष कबूली

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 01, 2025 | 09:08 AM
विमान का पाडलं गेलं, यापेक्षा महत्त्वाचं आहे का आणि कसं पडलं”? CDSअनिल चौहानांची अप्रत्यक्ष कबूली
Follow Us
Close
Follow Us:

CDS Anil Chouhan News:  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत मोठा लष्करी संघर्षही झाला. या संघर्षात पाकिस्तानसह भारतीय लष्कराचेही नुकसान झाले का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या सगळ्यात मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षाच्या दरम्यान भारताच्या लढाऊ विमानांना झालेल्या नुकसानीबाबत विचारलेल्या प्रश्नांना भारताचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शनिवारी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल चौहान म्हणाले, “विमान पाडण्यात आली ही बाब गौण आहे, ती का पाडण्यात आली हे अधिक महत्त्वाचे आहे.” चौहान यांनी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या सहा विमानांच्या नुकसानाच्या दाव्यांना स्पष्टपणे फेटाळले, मात्र लढाऊ विमानांच्या संख्येबाबत कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. सीडीएस अनिल चौहान सध्या सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या शांग्री-ला संवादात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. तिथेच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

LPG Gas Cylinder: मोठी बातमी! आता जेवण स्वस्त होणार; गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची कपात

एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान म्हणाले, “हे महत्त्वाचं नाही की जेट पाडलं गेलं, महत्त्वाचं हे आहे की ते का पाडलं गेलं. या न्युज चॅनेलने  या मुलाखतीचा एक मिनिट पाच सेकंदांचा भाग आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. “पाकिस्तानने भारताची एकापेक्षा जास्त लढाऊ विमानं पाडली आहेत, असा पाकिस्तानकडून दावा कऱण्यात आला आहे, याबाबत आपण काही सांगू शकता का?

यावर चौहान उत्तर देताना म्हणाले की ” चांगली गोष्ट ही आहे की आम्ही आमच्या टॅक्टिकल चुका ओळखल्या, त्या सुधारल्या आणि दोन दिवसांत त्या सुधारणा अंमलात आणल्या. त्यानंतर आम्ही सर्व जेट पुन्हा उडवले आणि लांबच्या लक्ष्यांवर निशाणा साधला.” त्यानंतर “पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी भारताची सहा लढाऊ विमाने पाडली, तो कितपत योग्य आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सीडीएस चौहान स्पष्टपणे म्हणाले की, “हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. पण जसे मी सांगितलं, संख्या महत्त्वाची नाही, महत्त्वाचं हे आहे की विमाने का पाडली गेली आणि त्यानंतर आम्ही काय केलं. हेच आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.”

काळजी घ्या ! देशभरात कोरोनाचा वाढतोय धोका; गेल्या 24 तासांत 7 जणांचा मृत्यू तर रुग्णसंख्या पोहोचली…

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारताविरोधात प्रतिहल्ला केल्याचा दावा करण्यात आला. याच दिवशी, म्हणजे 7 मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेत बोलताना असा दावा केला की, त्यांनी भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले असून त्यामध्ये भारताची 5 लढाऊ विमाने पाडण्यात आली. त्यांनी असा आरोपही केला की या 5 विमानांपैकी 3 विमाने राफेल होती.

यानंतर पाकिस्तानकडून आपला दावा आणखी वाढवण्यात आला. पुढे त्यांनी 6 भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा करत अधिक तीव्र प्रतिक्रिया दिली. दरम्यान, भारताकडून पाकिस्तानच्या या दाव्यांना सातत्याने फेटाळण्यात आले असून, लढाऊ विमानांच्या नुकसानीसंदर्भातील खात्रीशीर माहिती अजूनपर्यंत अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.

 

 

Web Title: Why was the plane shot down is it more important than this and how did it go down cds anil chauhans indirect confession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • india pakistan war
  • India-Pakistan Conflict

संबंधित बातम्या

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया
1

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.