गॅस सिलेंडरच्या दरात कपात (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक, लहान मोठी रेस्टॉरंट यांना दिलासा मिळाला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी गासची किंमत कंपन्यांनी २४ रुपयांनी कमी केली आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति एलपीजी गॅसच्या किमतीत ८० रुपयांनी कपात झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या १ तारखेपासून २४ रुपयांनी सिलेंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.
देशात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १९०० रुपयांपेक्षा जास्त नाहीये. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट करत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही घट करण्यात आलेली नाही. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्याने जेवण स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एव्हीएशन टर्बाइन फ्यूएलच्या दरात कपात
व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाले असतानाच, विमानसाठी लागणाऱ्या एव्हीएशन टर्बाइन फ्यूएलच्या दरात कपात करण्यात आली आहे. याचे दर जवळपास ४.४ टक्क्यांनी कमी झाले आहेत. विमानाचे इंधन स्वस्त झाल्याने त्याचा फायदा प्रवाशांना मिळणार हे पहावे लागणार आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्याने रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर अन्न व्यवसायांशी संबंधित लोकांना दिलासा मिळेल. हे व्यवसाय त्यांच्या दैनंदिन कामांसाठी व्यावसायिक सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
LPG Gas Cylinder: एलपीजी सिलेंडर 41 रुपयांनी स्वस्त, काय आहेत तुमच्या महानगरातील नवे दर? जाणून घ्या
देशातील प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑइलची उपकंपनी असलेल्या इंडेनच्या मते, एप्रिलच्या सुरुवातीपासून नवीन दर लागू झाले आहेत.
यावेळी फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलण्यात आल्या आहेत. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे दर समान आहेत. यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दिलासा मिळेल, तर सामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघरांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.