कानपूर : देशात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने (Crime Increases) वाढ होत आहे. त्यात अनेक घटनाही समोर येत आहेत. आता उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे तिचे नाकच चाकूने कापल्याचे समोर आले आहे. इतकेच नाहीतर त्यानंतर त्याने मुलीचा गळा दाबून खूनही केला आणि नंतर स्वत:ही गळफास घेऊन जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने कानपूर (Crime in Kanpur) हादरले आहे.
आरोपी पतीला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे माहिती होती. त्याने यापूर्वीही दोनदा त्याच्या पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने पत्नीसह मुलीचा खून केला आणि स्वत: आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. नाक कापल्यानंतर संबंधित महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘आरोपी छोटे शाहचा विवाह रुखसार नावाच्या महिलेशी 14 वर्षांपूर्वी झाला होता. जिल्हा पंचायत सदस्याच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होता. या पती-पत्नीमध्ये पूर्वीपासून वाद होत होते. त्यामुळे दोघेही 7 महिन्यांपासून वेगळे राहत होते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. पतीने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यात त्याने तिचे नाक कापले आणि नंतर मुलीचा खून केला’.