प्रयागराज: गंगा नदीत अंघोळ केल्याने तरुणांना रोजगार मिळेल का, गरिबी दूर होईल का, आपल्याला खायला अन्न मिळेल का? असे सवाल उपस्थित करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होती अमित शाहांनी आज गंगी नदीत स्नान केले. यावर मध्य प्रदेशातील महू येथे काँग्रेसच्या जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीला संबोधित करताना खर्गेनी शाहांवर तिखट वार केले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभात स्नान केल्यानंतर लगेचच खरगे यांचे हे विधान आले आहे. शाह आज प्रयागराजला पोहोचले आहेत. जिथे त्यांनी संत आणि ऋषींसोबत महाकुंभात स्नान केले. शाह यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. एक दिवस आधी, रविवारी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही महाकुंभात जाऊन त्रिवेणी संगमात स्नान केले.
Waqf Bill : वक्फ दुरुस्ती विधेयक नवीन स्वरूपात येणार, जेपीसीने १४ सुधारणांना दिली मान्यता
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ” मला कोणाच्याही श्रद्धेला दुखावायच्या नाहीत. पण आजही देशातील लाखो मुले शाळेत जात नाहीत, मजुरांना मजुरी मिळत नाही. पण जोपर्यंत टिव्ही मध्ये चांगली डुबकी दिसत नाही, तोपर्यंत डुबकी मारण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे दिसत आहे. आपल्या सर्वांना धर्मावर श्रद्धा आहे. धर्म आपल्या सर्वांसोबत आहे, परंतु जर कोणत्याही समाजात धर्माच्या नावाखाली गरिबांचे शोषण होत असेल तर आपण ते कधीही सहन करणार नाही.
खर्गे म्हणाले की, बाबा साहेबांचे उद्दिष्ट समाजातील लोकांमध्ये समानता प्रस्थापित करणे होते आणि त्यासाठी त्यांनी अनेक कायदे केले. जर कोणी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी होते. पाठिंबा मिळाल्यानंतरच बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष झाले. जर तुम्हाला काही साध्य करायचे असेल तर तुम्ही एकजुटीने कठोर परिश्रम केले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत तुम्हाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
ये सब क्या देखणा पड रहा है! भाजी पाण्यात टाकताच घडलं असं…महिलांनो हा Viral Video
खर्गे म्हणाले की, ‘मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी काय घडले होते हे तुम्हाला माहित असेलच. एका आदिवासी मुलाला तोंडात लघवी करून अपमानित करण्यात आले. घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडि तरूणाचे पाय धुतले, पण पाय धुण्याने प्रश्न सुटणार नाहीत. संविधानाने दिलेल्या संरक्षणाचा वापर केला आणि त्यांचे संरक्षण केले, तरच काहीतरी घडेल.