(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आपल्या निरोगी आरोग्यासाठी भाज्यांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे आणि फायद्याचे ठरते. भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात जे आपल्या शरीरासाठी फायदेकारक ठरतात. यामुळेच लहानपणापासून आपल्याला भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सध्या भाज्यांसंबंधीचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून भाज्यांबाबतचे तुमचे मन नक्कीच बसलेल. यातील दृश्ये तुमचे होश उडवतील. महिला असाल तर तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पाहायला हवा. यात नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काही काळापासून बाजारात केमिकलयुक्त भाज्या येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र सध्या याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये महिला भाजी बनवण्याआधी तिला पाण्यात टाकू पाहते मात्र तितक्यात असे काही घडते की पाहून तिलाही आश्चर्याचा धक्का बसतो. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये पाहून तुम्हीही भाजी घेताना दाह वेळा विचार कराल.
काय आहे व्हिडिओत?
बाजारातून भाज्या खरेदी करताना आपण फार चापून-चोपून त्या निवडतो, भाज्या फ्रेश आहेत की नाही या सर्व गोष्टी आपण तपासतो मात्र या भाज्यांना कशाप्रकारे पिकवले जात आहे याचा विचार आपण कधी केला आहे का? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला बाजारातून खरेदी केलेली भाजी साफ करण्यासाठी पाण्यात टाकते मात्र पुढच्याच क्षणी या भाजीचा रंग बदलतो आणि यावर हलका जांभळा कलर दिसू लागतो. तसेच या पाण्यावर तेलाचा थर देखील तरंगू लागतो. आता अशी ही भाजी आपल्या पोटात गेली तर आपल्यासोबत काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे सध्या आजराचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
दरम्यान व्हायरल व्हिडिओ पाहून आता सोशल मीडिया युजर्स प्रचंड भडकले आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ होत आहे अशा प्रतिक्रिया आता या व्हिडिओला मिळत आहेत. आजकाल बाजारात प्लास्टिक तांदूळ, प्लास्टिकच्या भाज्या असे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे भाज्या खरेदी करताना थोडे सतर्क राहा आणि भाज्या तपासून मगच त्यांचा आपल्या आहारात समावेश करा. हा व्हायरल व्हिडिओ @baltej नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.