Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Safty : महिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या का? ‘या’ सेवांवर कडक निर्बंध

Women Safty : राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या. यात ॲप-आधारित कॅबचा वापर करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडण्यात आला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 05, 2026 | 08:41 PM
Women Safty : महिलांच्या सुरक्षिततेसाठी आयोगाची ही नवी गाइडलाइन्स पाहिली का? 'या' सेवांवर असणार कडक निर्बंध

Women Safty : महिलांच्या सुरक्षिततेसाठी आयोगाची ही नवी गाइडलाइन्स पाहिली का? 'या' सेवांवर असणार कडक निर्बंध

Follow Us
Follow Us:
  • महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आयोगाचे कठोर पाऊल
  • गाइडलाइन्सनचे पालन करण्याच्या राज्यांना सूचना
  • महिला प्रवाशांना प्रवास रद्द करण्याचा अधिकार
 

राष्ट्रीय महिला आयोग (NCW) च्या वतीने सोमवारी ॲप-आधारित कॅबचा वापर करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी (Women Safty)  मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी करण्यात आल्या. यामध्ये प्रत्यक्ष पॅनिक बटण, वाहन ठरलेल्या मार्गापासून भरकटल्यास रिअल-टाइम अलर्ट, दीर्घकाळ किंवा संशयास्पद ठिकाणी थांबल्यास त्यावर देखरेख, तसेच कॅब सेवा पुरवठादारांनी २४×७ कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे.

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर याबाबत म्हणाल्या की, या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश बुकिंगच्या वेळी, प्रवासादरम्यान आणि प्रवास पूर्ण झाल्यानंतर सुरक्षेसंदर्भातील तसेच जबाबदारी निश्चित करण्याच्या विद्यमान उपाययोजना अधिक मजबूत करणे हा आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.

राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सूचना

रहाटकर पुढे म्हणाल्या की, आयोगाने सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांना ही नवी मार्गदर्शक सूचना लागू करण्यासह योग्य पावलं उचलण्यास सांगितले आहे.

या मार्गदर्शक सूचनांमध्ये कॅब सेवा पुरवठादारांनी सुरक्षा प्रोटोकॉल आणि प्रमाणित कार्यपद्धतींचा (SOP) नियमित आढावा घेणे, निश्चित कालमर्यादेत तक्रारींचे निवारण करणारी यंत्रणा उपलब्ध करून देणे, तक्रारी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडे पाठवणे, तसेच वेळोवेळी नियमांचे पालन आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अहवाल सादर करण्यावरही भर देण्यात आला आहे.

मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, ड्रायव्हर किंवा वाहनामध्ये करण्यात आलेला कोणताही अनधिकृत बदल ॲपवर योग्य पद्धतीने नोंदवला जाईल आणि त्याकडे सुरक्षेशी संबंधित बाब म्हणून पाहिले जाईल. हे मोटार वाहन एग्रीगेटर मार्गदर्शक सूचना, २०२५ मधील कलम १५.४ नुसार आहे. या कलमानुसार प्रवास करणारा ड्रायव्हर हाच संबंधित व्यक्ती आहे, याची पडताळणी करण्यासाठी ॲपमध्ये व्यवस्था असणे आवश्यक आहे. तसेच, कलम १४.९ नुसार ड्रायव्हरचा स्पष्ट आणि उच्च-रिझोल्यूशन फोटो ॲपवर प्रदर्शित करणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

NCW Issues Detailed Guidelines to States and UTs for Safety of Women Passengers Using App-Based and Digital Transport Services https://t.co/DUXNKRY2b9 — NCW (@NCWIndia) October 5, 2026

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

..तर महिलांना प्रवास रद्द करण्याचा अधिकार

तसेच ॲप-आधारित आणि डिजिटल वाहतूक सेवा वापरणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये निश्चित कालमर्यादेत तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा, ड्रायव्हर आणि वाहनाची पडताळणी, तसेच ॲपवर दाखवण्यात आलेली ड्रायव्हर किंवा वाहनाची माहिती प्रत्यक्षातील माहितीसोबत जुळत नसल्यास कोणताही दंड न आकारता प्रवास रद्द करण्याची सुविधा देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

उशिरा रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षिततेची मागणी करताना मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, कॅब सेवा पुरवठादारांनी रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या चालकांच्या पडताळणी आणि देखरेखीसाठी अधिक सक्षम यंत्रणा विकसित करावी. तसेच मार्गदर्शक सूचनांमध्ये पुढे म्हटले आहे की, प्रवास सुरू होताना चालकाच्या फोटोची अनिवार्य पडताळणी, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यास त्यावर कारवाई करण्याची व्यवस्था, प्रवाशाने निवड केल्यास विश्वासू संपर्कांना प्रवासाची माहिती आपोआप शेअर करण्याची सुविधा, अधिक सक्षम कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि प्रवासाच्या शेवटी सुरक्षित ठिकाणी सोडण्याचा पर्याय यांसारख्या उपायांचा समावेश केला जाऊ शकतो.

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश

तसेच, चालकांसाठी वेळोवेळी सुरक्षा आणि लिंग-संवेदनशीलता प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात यावा असेही आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. चालकांना कामावर घेण्यापूर्वी तसेच त्यानंतरही नियमित अंतराने गुन्हेगारी नोंदींची तपासणी, पोलीस पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणी करण्याची गरजही मार्गदर्शक सूचनांमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.

Web Title: Women safty commission issues new guidelines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Cab Driver
  • women safety

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.