India and afg relation
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. अधिकृत स्तरावर तसेच विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अफगाणिस्तान आपापसांतील संवाद आणि देवाणघेवाण अधिक वाढवतील.
“आम्हाला विश्वास आहे की संवाद आणि चर्चेद्वारे भारत व अफगाणिस्तान या दोन देशातील नातं दृढ होईल. .
भारत हा आमचा जवळचा मित्र देश आहे, आणि आम्ही कोणत्याही गटाला अफगाण भूमीचा वापर इतरांच्या विरोधात करण्याची परवानगी देणार नाही.”
सन १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर आमचे द्विपक्षीय राजनैतिक संबंध सुरू झाले. अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही एकमेकांशी जवळची भूमिका घेतली आहे. आता या संबंधांना अधिक बळकटी देणे, आणि एकमेकांच्या क्षमतांचा व संधींचा उपयोग करणे गरजेचे आहे.
भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या जनतेसोबत उभा राहिला आहे. अलीकडील कोंडारमधील भूकंपाच्या वेळी भारत हा सर्वात पहिला देश होता ज्याने मानवी मदतीसाठी पुढाकार घेतला. आम्ही याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि भारताला जवळचा मित्र मानतो.
अफगाणिस्तान परस्पर आदर, व्यापार आणि जनतेतील सुसंवादावर दोन्ही देशांचे संबंध पुढे नेऊ इच्छितो. इस्लामिक एमिरात अफगाणिस्तान या दोन देशांमधील नातं मजबूत करण्यासाठी सल्लागार यंत्रणा तयार करण्यास तयार आहे.
सुमारे नऊ महिन्यांपूर्वी दुबई येथे माझी भारताचे उपविदेशमंत्री विक्रमसिंह यांच्याशी भेट झाली, जी उच्चस्तरीय संवादाची सुरुवात होती. त्यानंतर भारताच्या अधिकाऱ्यांसोबत दोन दूरध्वनी संभाषण झाले, ज्यामुळे या संबंधांना नवी गती मिळाली. या भेटीद्वारे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील परस्पर समज अधिक बळकट होईल आणि या संबंधांमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होईल.
डोनाल्ड ट्रम्प नव्हे तर ‘यांना’ मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिल्लीतील एका महत्त्वपूर्ण परिषदेतून पाकिस्तान आणि अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमचा देश कोणत्याही परकीय दबावाखाली झुकणार नाही. अफगाणिस्तान आपल्या सार्वभौम धोरणानुसार निर्णय घेईल.”
पाकिस्तानने सीमाभागातील हस्तक्षेप थांबवावा, अन्यथा कठोर पावले उचलली जातील, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
FAQ
1) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध सध्या कसे आहेत?
भारत आणि अफगाणिस्तान संबंध मैत्रीपूर्ण आहेत. दोन्ही देश व्यापार, संस्कृती आणि सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवू इच्छितात.
2) या भेटीचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे?
परस्पर समज वाढवणे, सल्लागार यंत्रणा तयार करणे आणि द्विपक्षीय संबंध दृढ करणे.
3) अफगाणिस्तानने भारताबद्दल कोणते वक्तव्य केले?
अफगाणिस्तानने स्पष्ट केले की, त्यांनी कधीही भारताविरोधात विधान केले नाही आणि भारताला नेहमी जवळचा मित्र मानले आहे.
4) भारताने अलीकडे अफगाणिस्तानला कोणती मदत केली आहे?
कोंडारमधील भूकंपाच्या वेळी भारताने सर्वात पहिला प्रतिसाद देत मानवी मदत पुरवली.