Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yamuna Flood: यमुनेला महापूर! दिल्ली बुडण्याच्या मार्गावर? ‘हे’ मार्ग पाण्याखाली; अनेक मेट्रो स्टेशन्स तर…

Delhi flood Alert: पावसाचा जोर वाढतच असल्याने यमुना नदीची पाणी पातळी वाढत आहे. दिल्लीतील अनेक भागात नदीचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2025 | 06:55 PM
Yamuna Flood: यमुनेला महापूर! दिल्ली बुडण्याच्या मार्गावर? ‘हे’ मार्ग पाण्याखाली; अनेक मेट्रो स्टेशन्स तर…
Follow Us
Close
Follow Us:

देशातील अनेक राज्यांमध्ये महापूर 
राजधानी दिल्लीत राज्य सरकार सतर्क 
हजारो लोकांचे स्थलांतर

Delhi/Yamuna River Flood: देशभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. पंजाब, दिल्ली या राज्यांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राजधानी दिल्लीत तर पुरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश पाठोपाठ हरियाणा राज्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. यमुना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे दिललीवर पुराचे संकट उभे राहिले आहे.

पावसाचा जोर वाढतच असल्याने यमुना नदीची पाणी पातळी वाढत आहे. दिल्लीतील अनेक भागात नदीचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवार पासून यमुना नदीचे पाणी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. प्रशासन सातत्याने बचावकार्य करत आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. आतापर्यंत तब्बल 5 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

दिल्लीत काही भागात यमुनेचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.  एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हरियाणाच्या हाथिनीकुंड धरणातून मोठ्या प्रमान्यतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत महापुराचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

VIDEO | Delhi rains: Drone visuals show Kashmere Gate bus terminal inundated as the Yamuna river level continues to rise.#Delhi #YamunaRiver #YamunaWaterLevel #DelhiRains

(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/f2DvJA6Tfs

— Press Trust of India (@PTI_News) September 4, 2025

दिल्लीतील लोहा ब्रिजनंतर आता, वजीराबाद ब्रिज बंद करण्यात आला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यमुना बँक मेट्रो स्टेशनकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला आहे. काश्मिरी बस गेट टर्मिनल पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे समजते आहे.

महापुरामुळे जनजीवन विस्कळीत

दिल्लीच्या यमुना बाजार, मजनू का टीला, मयूर विहार, गीता कॉलनी आणि झरोडा कलान यांसारख्या भागात घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान खात्याने या महिन्यातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. खराब हवामान आणि पावसामुळे विमानसेवेवर परिणाम झाला आहे. काही विमाने उशिराने उड्डाण करत आहेत. तर काही विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी…

दरम्यान, यमुना नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबाबत डीएमआरसीने अलर्ट दिला आहे. यमुना नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे, यमुना बँक मेट्रो स्टेशनकडे जाणारा जोडणारा रस्ता सध्या दुर्गम आहे. स्टेशन कार्यरत असून, इंटरचेंज सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती डीएमआरसीने दिली आहे. दिल्लीतील यमुना नदीकाठच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच वेळी, यमुना बाजारात असलेले खाजगी रुग्णालय रिकामे करण्यात आले आहे. आता तिथे एकही रुग्ण नाही. यमुनेच्या पुरात नालाही बुडाला आहे. नाला पुराच्या पाण्याने भरला आहे. काश्मिरी गेटवरून निगम बोध घाटाकडे येणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी पोहोचले आहे.

 

Web Title: Yamuna river cross alert line heavy flood in delhi many areas metro station closed latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • delhi rains
  • Flood situation
  • Heavy Rain

संबंधित बातम्या

SC On Flood: “आम्ही निसर्गासह इतकी छेडछाड…”; ‘या’ राज्यांमधील महापुरावर कोर्टाने काढली थेट नोटीस; म्हणाले…
1

SC On Flood: “आम्ही निसर्गासह इतकी छेडछाड…”; ‘या’ राज्यांमधील महापुरावर कोर्टाने काढली थेट नोटीस; म्हणाले…

SC On Flood: “आम्ही निसर्गासह इतकी छेडछाड…”; ‘या’ राज्यांमधील महापुरावर कोर्टाने काढली थेट नोटीस; म्हणाले…
2

SC On Flood: “आम्ही निसर्गासह इतकी छेडछाड…”; ‘या’ राज्यांमधील महापुरावर कोर्टाने काढली थेट नोटीस; म्हणाले…

Heavy Rain Alert: देशभरात पावसाचा कहर; उत्तराखंड नव्हे तर ‘या’ राज्यांमध्ये घालणार धुमाकूळ, IMD चा अलर्ट काय?
3

Heavy Rain Alert: देशभरात पावसाचा कहर; उत्तराखंड नव्हे तर ‘या’ राज्यांमध्ये घालणार धुमाकूळ, IMD चा अलर्ट काय?

Punjab Flood : राघव चड्ढा यांच्यानंतर आणखी एका आपच्या खासदाराचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; एका महिन्याचा दिला पगार
4

Punjab Flood : राघव चड्ढा यांच्यानंतर आणखी एका आपच्या खासदाराचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; एका महिन्याचा दिला पगार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.