आज संध्याकाळच्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मुसळधार पावसाने संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाणाऱ्या लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागला.
गेले काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्वतीय राज्य, पूर्वेकडील राज्ये, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. राजधानी दिल्लीत देखील यंदाच्या वर्षी जोरदार हजेरी लावली.
भारतीय हवामान विभागाने उत्तराखंड, गुजरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. केरळ, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
26 जूनपर्यंत हवामान विभागाने मध्यप्रदेश, गुजरात, कोकण, गोवामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. पुढील तीन दिवस किनारपट्टी आणि उत्तर आणि पूर्व भारतात अति ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो.
शनिवारी रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. दरम्यान गाझियाबादमध्ये एक दु:खद घटना घडली. अंकुर विहार एसीपी कार्यालयाचं छत कोसळून उपनिरीक्षक वीरेंद्र कुमार मिश्रा यांचा मृत्यू झाला.