
Year Ender 2025
Year Ender 2025 : PM मोदींचा जागतिक स्तरावर डंका! एका वर्षात तब्बल 18 देशांच्या संसदेत घुमला आवाज
भारताचे पहिले इन-स्पेस डॉकिंग : 2025 ची सुरुवात ही भारतीय अंतराळ क्षेत्राने मोठी ऐतिहासिक कामगिरी करत केली. १६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ISRO ने ऑर्बिटमध्ये दोन उपग्रहांचे यशस्वी इन-स्पेस डॉकिंग केले. यामुळे ISRO च्या SpaDex मिशनला मोठे यश मिळाले. SDX-01 आणि SDX-02 या उपग्रहांचे इन-स्पेस डॉकिंग करण्यात आले. या उपग्रहांच्या स्वयंचलित डॉकिंगमुळे भारत ही क्षमता दाखवणार चौथा देश बनला. यामुळे भारताला भविष्यात अंतराळ मोहिमांसाठी, स्पेस स्टे आणि उपग्रहांसाठी मोठी मदत मिळणार आहे.
GSLV-F15 सह १०० वे रॉकेट प्रक्षेपण : यांनतर ISRO ने श्रीहरीकोट्टा येथून २९ जानेवारी २०२५ रोजी आपल्या १०० व्या रॉेकेटचे प्रक्षेपण केले. या रॉकेटद्वारे भारताने GSLV-F15 चे देखील लॉन्चिंग केले. या रॉकेटद्वारे नेव्हिगेशन सॅटेलाईट NVS-02 कक्षेत पाठवण्यात आले आहे. हा टप्पा भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत खास ठरला होता.
NASA आणि ISRO चे NISAR मोहीम : भारताची अंतराळ संस्था ISRO ने नासाच्या सहकार्याअंतर्गत NISAR मिशनचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. हे जगातील पहिले ड्युअल फ्रीक्वेन्सी सिंथेटिक अपर्चक रडार सॅटेलाइट असून भूकंप, बर्फवृष्टी, ज्वालामुखी, हवामान बदलांचे अचूनक निरीक्षण करता येते.
आदित्य L1 : याशिवाय भारताची पहिली सौर वेधशाळा, आदित्य L1ही यशस्वीरित्या कार्यरत झाली. इस्रोने जागतिक संशोधकांसाठी १५ टेराबाइट्स मिशन डेटा उपलब्ध करुन दिला. ज्यामुळे भारताला सौर ज्वाला, कोरोनल मास इजेक्शन, सौर वारे आणि चुंबकीय वादळांचे उच्च-रिझोल्यूशनचे निरिक्षणे सोपे झाले.
Axiom-4 Mission : या सर्व मोहिमांमध्ये सर्वात यशस्वी आणि अभिमानास्पद मोहिम ठरली ती शुभांशु शुक्ला यांची. शुभांशू शुक्ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले. त्यांनी १८ दिवस अंतराळात मॉयक्रोग्रॅव्हिटी प्रयोग केले. तसेच त्यांनी भारताचा तिंरगा देखील स्पेस स्टेशनवर फडकवला.
ISRO ‘Bluebird Block-2 Satellite Launch : नुकतेच भारताने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM3-M6 चे प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. हे उपग्रह स्मार्टफोनला थेट ४जी आणि ५जी सेल्युलर ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. आहे.