प्रिन्स एडवर्ड, ड्यूक ऑफ एडिनबर्ग हे ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य, आणि नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड व्हॅन वील आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर
डॉ. केनेथ ड्युकेटेल : २ डिसेंबर रोजी अजिंठा लेण्याचे शोधक मेजर रॉबर्ट गिल यांचे वंश डॉ. केनेथ ड्युकेटेल यांनी अजिंठा लेण्यांना भेट दिली होती. छत्रपती संभाजीनगरचा वारसा आणि पर्यटकांचा उत्साह पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले होते. ते आपल्या पत्नीसह भारताच्या तीन आठवड्यांच्या दौऱ्यावर होते.
डेव्हिड व्हॅन वील : नेदरलॅंड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड व्हॅन वील यांनी देखील मुंबईला भेट दिली होती. त्यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच त्यांनी या भेटीत वेस्टर्न नेव्हल कमांड आणि माझगाव डॉला भेट देत संरक्षण आणि सागरी सहकार्याचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक व्यावसायिक समुदायाच्या लोकांशीही संवाद साधला.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर : २०२५ मध्ये काही जागतिक VVIP नी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला भेट दिली होती. यातील एक म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी मुंबईला भेट दिली होती. ८ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्यांची भारतात ही अधिकृत भेट होती. यावेळी त्यांनी ग्लोबल फिटनेक फेस्ट २०२५ च्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अध्यक्षपद भूषवले. ही भेट भारत-ब्रिटन भागीदारी आखलेल्या व्हिजव-२०३५ साठी अत्यंत खास ठरली.
एनरिक इग्लेसियास : जागतिक सुपरस्टार एनरिक इग्लेसियास यांनी त्यांच्या किंग ऑफ लॅटिन पॉप इंडिया टूरदरम्यान मुंबईला भेट दिली होती. २९ ते ३० ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांचा भारतातील पहिला कार्यक्रम मुंबईत पार पडला होता.
यंग ग्लोबल लीडर्स : याशिवाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्सनी देखील मुंबईला भेट दिली होती. या गटातील ४० देशांतील ५० सदस्य १४ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईत इंडिया लर्गिंग जर्नी अंतर्गत आले होते. त्यांनी राजभवाना महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अनेक जागतिक आव्हाने आणि शाश्वत विकासावर चर्चा करण्यात आली.
प्रिन्स एडवर्ड : ड्यूक ऑफ एडिनबर्ग उर्फ प्रिन्स एडवर्ड यांनी २ फेब्रुवारी २०२५ ला मुंबई येथे राजभनाला ब्रिटिशकालीन बंकरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचीही भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ मे २०२५ रोजी भेट दिली होती. त्यांनी वेव्ह्स २०२५ या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले होते. तसेच त्यांनी २० ३० मार्च २०२५ ला नागपूर येथे स्मृती मंदिरालाही भेट दिली होती.






