Year Ender 2025 : PM मोदींचा जागतिक स्तरावर डंका! एका वर्षात तब्बल 18 देशांच्या संसदेत घुमला आवाज
या वर्षात पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन आणि कॅरिबियन देशांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी आफ्रिकन देश नामीबिया, घाना, त्रिनिदाद, आणि टोबॅगो ला भेट दिली. तसेच त्यांनी इथिओपियाच्या संसदेतस संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून भारत-आफ्रिका भागीदारी, ग्लोबल साउथ नेतृत्व, विकास, लोकशाही मूल्ये आणि शांततेचा संदेश दिला. इथिओपियाच्या संसदेत भारताच्या दहशतवादविरोधी भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी भारत-आफ्रिका भागीदारीच्या नव्या संबंधाची सुरुवातही केली.
पंतप्रधान मोदींनी केवळ भाषण केले नाही, तर त्यांनी इतर देशांना भारत विश्वासार्ह असल्याचे आणि शाश्वत विकासावर केंद्रित असल्याचे दाखवून दिले. भूतान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, फिजी, श्रीलंका, मॉरिशस, मंगोलिया, ब्रिटना, मालदीव, युगांडा, अफगाणिस्तान या देशांच्या संसदांमध्ये भारताची भूमिका मांडली. यामुळे भारताच्या शेजारी देशांशी असलेल्या संबंधांना अधिक बळकटी मिळाली. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत १८ देशांना संबोधित केले. यापूर्वी त्यांनी २०१६ आणि २०२३ मध्ये अमेरिकेच्या संसदेला संबंधित केले होते.
पंतप्रधान मोदींपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सात वेळा परदेशी संसंदांना संबोधित केले होते. इंदिरा गांधी यांनी चार वेळा तर पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तीन वेळा आणि राजीव गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन वेळा परदेशी संसदांना संबोधित केले. तर मोरारजी देसाई आणि पी. व्ही राव यांना एकदा हा सन्मान मिळाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताची जागतिक व्यासपीठावर लोकप्रियता वाढली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या धोरणात्मक भूमिकेला अत्यंत स्पष्टपणे मांडले आहे. या वर्षात भारतासाठी जागतिक स्तरावर भारताच्या जागतिक नेतृत्त्वाचा प्रभाव वाढवणारे आणि मजबूत करणारे ठरले आहे. यामुळे भारताचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवत आहे. आता येते वर्ष २०२६ भारतासाठी कसे असेल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर






