Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cosmic Wonder: असं दृश्य पुन्हा दिसणार नाही! फेब्रुवारीत ‘या’ दुर्मिळ घटना ठरतील खगोलप्रेमींसाठी मेजवानी; पाहा भारतातून दिसेल का?

Planetary Parade February 2026 India: फेब्रुवारी महिना हा अंतराळप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक महत्त्वाच्या खगोलीय घटना घडतील ज्याची खगोलशास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून वाट पाहत होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 07, 2026 | 08:22 PM
planetary parade and ring of fire solar eclipse february 2026 india visibility

planetary parade and ring of fire solar eclipse february 2026 india visibility

Follow Us
Close
Follow Us:
  • आकाशात अग्नीचे कंकण
  • सहा ग्रहांची महा-परेड
  • भारतीयांसाठी खास संधी

Planetary Parade February 2026 India : तुम्हाला जर रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघून ताऱ्यांची आणि ग्रहांची गुपिते शोधायला आवडत असेल, तर हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी एक मोठी पर्वणी घेऊन आला आहे. या महिन्यात अंतराळात अशा काही उलाढाली होणार आहेत, ज्या पाहून सामान्य माणूसही थक्क होईल आणि खगोलशास्त्रज्ञांना अभ्यासाची नवीन संधी मिळेल. या महिन्यात आपल्याला दोन अत्यंत मोठ्या घटनांचे साक्षीदार होता येणार आहे पहिले म्हणजे आकाशात तयार होणारे सूर्याचे ‘अग्नीचे वलय’ (Ring of Fire) आणि दुसरे म्हणजे आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचे एक दुर्मिळ संमेलन, ज्याला ‘प्लॅनेटरी परेड’ (Planetary Parade) म्हटले जाते.

१७ फेब्रुवारी: वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि ‘रिंग ऑफ फायर’

येत्या १७ फेब्रुवारी रोजी, म्हणजे अमावस्येच्या दिवशी २०२६ सालातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) होणार आहे. हे साधेसुधे सूर्यग्रहण नसून ते ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ (Annular Solar Eclipse) असणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

नेमके काय घडणार?

जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या अगदी मधोमध येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. पण यावेळी चंद्र पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूवर (Apogee) असेल. त्यामुळे तो आकाशात आकाराने थोडा लहान दिसेल. परिणामी, तो सूर्याला पूर्णपणे झाकले तरी सूर्याची बाहेरची कडा (Edges) झाकली जाणार नाही. यामुळे चंद्राच्या काळ्या बिंबाभोवती सूर्याचा एक तेजस्वी प्रकाश झळाळताना दिसेल. यालाच खगोलशास्त्रात ‘रिंग ऑफ फायर’ किंवा ‘अग्नी कंकण’ म्हटले जाते. नॅशनल जिओग्राफिकच्या आकडेवारीनुसार, ग्रहण जेव्हा त्याच्या शिखरावर असेल, तेव्हा चंद्र सूर्याचा ९२% भाग व्यापून टाकेल. हे तेजस्वी कंकण आकाशात २ मिनिटे १९ सेकंद टिकणार आहे. हे दृश्य इतके विलोभनीय असते की, ते पाहण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ विशिष्ट ठिकाणी गर्दी करतात.

हे भारतातून दिसणार का?

दुर्दैवाने, हे ‘रिंग ऑफ फायर’ भारतातून दिसणार नाही. हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका (Antarctica) खंडातून स्पष्ट दिसेल. तसेच दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही भागांतून हे आंशिक स्वरूपात (Partial Eclipse) दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय खगोलप्रेमींना हे ग्रहण पाहण्यासाठी ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंगचा आधार घ्यावा लागेल.

Feb 17, 2026: A rare annular solar eclipse will ignite the sky, the Moon will cover the Sun’s center, leaving a blazing “Ring of Fire.” pic.twitter.com/8r0dJFPRuZ — Kekius Maximus (@Kekius_Sage) February 4, 2026

credit – social media and Twitter

२८ फेब्रुवारी: सहा ग्रहांची महा-परेड (भारतीयांसाठी सुवर्णसंधी)

जर सूर्यग्रहण हुकले म्हणून तुम्ही नाराज झाला असाल, तर निराश होऊ नका! निसर्गाने महिन्याच्या शेवटी भारतीयांसाठी एक खास भेट राखून ठेवली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्यास्तानंतर लगेचच आकाशात ‘ग्रहांची परेड’ (Planetary Parade) पाहायला मिळणार आहे.

कोणते ग्रह दिसणार? या दिवशी आपल्या सूर्यमालेतील ६ प्रमुख ग्रह—बुध (Mercury), शुक्र (Venus), शनि (Saturn), गुरू (Jupiter), युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune)—हे सर्व एका काल्पनिक सरळ रेषेत (Ecliptic Plane) आल्यासारखे वाटतील. यालाच ‘प्लॅनेटरी अलाईनमेंट’ असेही म्हणतात.

हे दृश्य कसे आणि कुठे पाहायचे? सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, ही ग्रहांची परेड भारतातून स्पष्टपणे दिसणार आहे.

  • उघड्या डोळ्यांनी काय दिसेल? गुरू, बुध, शुक्र आणि शनि हे चार ग्रह तुम्ही कोणत्याही उपकरणाशिवाय उघड्या डोळ्यांनी पाहू शकाल. शुक्र (Venus) नेहमीप्रमाणे सर्वात तेजस्वी असेल, तर गुरू (Jupiter) आणि शनि (Saturn) हे पिवळसर आणि सोनेरी ठिपक्यांसारखे चमकताना दिसतील.
  • दुर्बिणीची गरज: युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह पृथ्वीपासून खूप लांब आणि अंधुक असल्याने ते पाहण्यासाठी तुम्हाला चांगल्या पॉवरच्या दुर्बिणीची (Telescope) किंवा हाय-रेंज बायनोक्युलरची गरज भासेल.

पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ही परेड पाहण्यासाठी २८ फेब्रुवारीला सूर्यास्त होताच (संध्याकाळी ६.३० ते ७.३० च्या दरम्यान) पश्चिम क्षितिजाकडे नजर ठेवा. शहराच्या दिव्यांचा प्रकाश नसलेल्या मोकळ्या जागेवरून हे दृश्य अधिक स्पष्ट दिसेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Shift: बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’; SIPRI अहवालाने पाकला फुटला घाम

खगोलीय घटनांचे महत्त्व

अशा घटना केवळ डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नसतात, तर त्या विज्ञानासाठीही महत्त्वाच्या असतात. सूर्यग्रहणादरम्यान शास्त्रज्ञांना सूर्याच्या बाह्य आवरणाचा (Corona) अभ्यास करता येतो, तर ग्रहांच्या परेडमुळे ग्रहांच्या गती आणि स्थितीचा अचूक अभ्यास करण्यास मदत मिळते. फेब्रुवारी महिना हा खऱ्या अर्थाने ‘स्पेस टुरिझम’चा (Space Tourism) महिना ठरणार आहे. १७ तारखेला सूर्याचे रौद्र रूप आणि २८ तारखेला ग्रहांचे शांत संचलन, या दोन्ही घटना निसर्गाच्या भव्यतेची साक्ष देतात. तुम्हीही सज्ज व्हा, कारण आकाश आता बोलू लागले आहे!

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'रिंग ऑफ फायर' सूर्यग्रहण भारतातून दिसणार का?

    Ans: नाही, १७ फेब्रुवारीचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे प्रामुख्याने अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांतून दिसेल.

  • Que: ग्रहांची परेड (Planetary Parade) म्हणजे काय?

    Ans: जेव्हा सूर्यमालेतील अनेक ग्रह एकाच वेळी सूर्याच्या एका बाजूला आणि एका रेषेत आल्यासारखे दिसतात, तेव्हा त्या खगोलीय स्थितीला ग्रहांची परेड म्हणतात.

  • Que: २८ फेब्रुवारीला कोणते ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येतील?

    Ans: भारतातून २८ फेब्रुवारीला बुध, शुक्र, शनि आणि गुरू हे चार ग्रह उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येतील. युरेनस आणि नेपच्यूनसाठी दुर्बीण लागेल.

Web Title: Planetary parade and ring of fire solar eclipse february 2026 india visibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • astrological
  • planet
  • solar storm
  • Space News

संबंधित बातम्या

Ohio Meteor : अंतकाळाच्या सावटाखालील जग! NASA फेल, रडार शांत; कोणत्याही इशाऱ्याशिवाय पृथ्वीवर आदळला मोठा लघुग्रह
1

Ohio Meteor : अंतकाळाच्या सावटाखालील जग! NASA फेल, रडार शांत; कोणत्याही इशाऱ्याशिवाय पृथ्वीवर आदळला मोठा लघुग्रह

Kalpana Chawla Birth Anniversary : तारे पाहणारी ‘मोंटू’ कशी बनली अंतराळाची ‘कल्पना’? भारताच्या ‘हिरो’चा थक्क करणारा जीवन प्रवास
2

Kalpana Chawla Birth Anniversary : तारे पाहणारी ‘मोंटू’ कशी बनली अंतराळाची ‘कल्पना’? भारताच्या ‘हिरो’चा थक्क करणारा जीवन प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.