
कवठे गावातील १६ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा गौरव पुरस्काराने’ सन्मान
मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय साळुंखे म्हणाले, गावातील महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या कार्याची समाजाला ओळख करून देणे, इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी, हा या सोहळ्यामागील उद्देश आहे. महिलांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला दिलेले प्रोत्साहन आहे.
या उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला बळ मिळते. या कार्यक्रमास मैत्री फाऊंडेशनचे मार्गदर्शक राजेश साळुंखे, संचालक मारुती यादव, नवनाथ साळुंखे, सचिन साळुंखे, संजय साळुंखे, लालासाहेब पाटील, जगन्नाथ कुंभार, रमेश वाघ, सूर्यकांत जाधव उपस्थित होते. दिलीप माने यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, भरत साळुंखे यांनी आभार मानले.
सौ. सोनाली मारुती यादव, सौ. शितल समाधान सुतार, ह.भ.प. कु. सानिका चंद्रकांत यादव, सौ. आशा सूर्यकांत जाधव, राजश्री अधिकाराव यादव, श्रीमती सपना राजेंद्र चव्हाण, श्रीमती जयश्री आनंदराव यादव, श्रीमती जयसुधा पंकज सूर्यवंशी, सौ. राधा महेश यादव, सौ. अर्चना अवधूत पाटील, श्रीमती सुनंदा नानासो साळुंखे, श्रीमती सुनीता भरत यादव, सौ. लता विठ्ठल साळुंखे, श्रीमती कविता गोरखनाथ माने, श्रीमती शुभांगी प्रमोद माने व सौ. संध्या संतोष चव्हाण यांचा गौरव नवचैतन्य दुर्गा उत्सव मंडळातील महिला सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.