1st May 2025: सामान्यांना दिलासा मिळणार की खिशाला कात्री बसणार?
आयकर रिटर्न (ITR) फॉर्म १ आणि ४ नोटिफाय करण्यात आले आहेत. यानुसार आता ५० लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले लोक आता आयटीआर-१ फॉर्म वापरू शकतात
अमूल दुधाच्या ५०० मिली पॅकच्या किमतीत २ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच आता आरबीआयने रेपो दर कमी केला आहे, ज्यामुळे गृहकर्जाच्या व्याजदरात घट होण्याची शक्यता आहे
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल नाही, पण कमर्शिअल सिलिंडर स्वस्त झाले आहेत. काही बँकांनी एफडीवरील व्याज दर बदलले आहेत, ज्यामुळे लहान बचतकर्त्यांसाठी हा बदल फायदेशीर ठरू शकतो
रेल्वेने १ मे पासून वेटिंग लिस्टमध्ये असलेले प्रवासी स्लीपर किंवा AC कोचमध्ये प्रवास करू शकणार नाहीत. तर अशा प्रवाशांना जनरल कोचमधून प्रवास करावा लागेल. तसेच आता ररेल्वे तिकीट कॅन्सल केल्यास फक्त दोन दिवसांतच प्रवाशांना रिफंड दिला जाईल. ATM मधून जास्त पैसे काढल्यास शुल्क २३ रुपये आकारले जातील, आधी हा रेट २१ रुपये होता
‘एक राज्य, एक ग्रामीण बँक’ धोरणानुसार ११ राज्यांतील १५ ग्रामीण बँकांचे विलीनीकरण होईल, ज्यामुळे बँकांची संख्या ४३ वरून २८ होईल. यामुळे प्रभावित राज्यांमधील ग्राहकांना बँकिंग सुविधांमध्ये बदल दिसून येतील