आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते?
नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आईच्या गर्भात बाळाचे फुफ्फुस श्वास घेण्यासाठी तयार होतात. यासोबतच मेंदू आणि मज्जासंस्था परिपक्व होऊन बाळाचे सर्व अवयव हळूहळू तयार होऊ लागतात.
आईचे शरीर गर्भाला वाढवण्यासाठी खूप ऊर्जा वापरते. नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आईच्या शरीराचे चयापचय मंदावते. तसेच काहीवेळ गरोदरपण आईच्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात.
भारतीय शास्त्र आणि पुराणानुसार मानवाचा जन्म हा अत्यंत दुर्मिळ मानला जातो. मानवाचा जन्म केवळ उपभोग घेण्यासाठी नाहीतर आत्मोन्नती आणि ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी मिळालेली एक सुंदर देणगी असते.
भारतीय ब्रह्माण्डशास्त्र 9 चक्रांनी भरलेले आहे. या चक्रावर नियती नियंत्रण ठेवते. त्यामुळे शरीराचा पूर्ण विकास होईपर्यंत बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहते.
नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये पंचमहाभूतांपासून मानवी देह निर्माण होतो. जीवात्म्याला या जगात येण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक आणि मानसिक परिपक्वता नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये मिळते.