ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या ‘गप्पागोष्टी’मुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांत पोहोचला.
त्यांची अग बाई सासूबाई ही मालिका शेवटची ठरली.. या मालिकेत त्यांनी बबड्याच्या आजोबांची भूमिका केली होती. या मालिकेतील त्यांचे डायलॉग प्रसिध्द झाले
कोंबडीच्या…. ही बबड्याला मारलेली हाक घराघरात पोहचली
८० व्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोकपाठकरून त्यांनी श्रृंगेरी मठाची परीक्षाही दिली. पण नेमके परिक्षेच्या वेळी ते आजारी पडेल. पण हार मानतील ते रवी पटवर्धन कसले. आजारातही ते परिक्षेला गेले आणि पहिले आले.