परभणी जिल्ह्यात गणेश विसर्जनाचा सोहळा सकाळपासून उत्साहात सुरू असून यावर्षीही डीजे मुक्त विसर्जनाचे पालन केले जात आहे. तब्बल 1950 गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात होत आहे. पोलिस प्रशासनाने 118 अधिकारी व 850 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तर महानगरपालिकेने विसर्जन हौद, मूर्ती संकलन आणि निर्माल्य व्यवस्थापनाची विशेष सोय केली आहे.