GST कपात झाल्यानंतर 'या' कंपनीने कारच्या किमतीती केली 96,000 रुपयांची कपात (फोटो सौजन्य:iStock)
कार खरेदी करताना GST म्हणून अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. ज्यामुळे कारची ऑन रॉड किंमत वाढते. अनेकदा कार खरेदीदार GST कपात करावी अशी मागणी करत होते. शेवटी, केंद्र सरकारने सामान्य नागरिकांची हाक ऐकली आणि जीएसटीमध्ये महत्वाचे बदल केले. 28 टक्क्यांवर असणारा जीएसटी आता थेट 18 टक्क्यांवर येणार आहे. हा बदल येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. अशातच जर तुम्ही कार खरेदी करणार असाल तर मग Renault या आघाडीच्या कंपनीने त्यांच्या कारच्या किमतीत कपात केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
500 किमी रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचरसह भारतात व्हिएतनामची ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच
नवीन जीएसटी दरांचा परिणाम दिसू लागला आहे. अलिकडेच टाटा मोटर्सने त्यांच्या वाहनांच्या किमती कमी केल्या होत्या, आता रेनॉल्ट देखील या यादीत सामील झाली आहे. रेनॉल्टने त्यांच्या वाहनांच्या किमती 96,395 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. किमतीत कपात केल्यानंतर, Renault KWID ची सुरुवातीची किंमत 4.29 लाख रुपये आणि ट्रायबरची सुरुवातीची किंमत 5.76 लाख रुपयांवर पोहोचली आहे. यासोबतच, अलीकडेच लाँच झालेल्या KIGER ची किंमत देखील कमी करण्यात आली आहे.
रेनॉल्ट इंडियाने एक मोठे पाऊल उचलत ग्राहकांना GST 2.0 चा पूर्ण फायदा देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाअंतर्गत, कंपनीने त्यांच्या संपूर्ण कार लाइन-अपच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. आता रेनॉल्टच्या कार्स पूर्वीपेक्षा अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत, ज्यामुळे आगामी सणांमध्ये मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की नवीन किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील, परंतु ग्राहक नवीन किमतींवर लगेच कार बुक करू शकतात.
आता Fortuner खरेदी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! GST कपातीनंतर एसयूव्हीवर होईल भरभरून होईल बचत
Renault Triberच्या नव्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत आणि त्यामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. Authentic व्हेरिएंटची जुनी किंमत 6,29,995 होती, आता ती 5,76,300 झाली असून 53,695 ने कमी झाली आहे. Evolution व्हेरिएंट 7,24,995 वरून 6,63,200 झाला असून 61,795 ने कमी करण्यात आली आहे. Techno व्हेरिएंटची किंमत ₹7,99,995 वरून ₹7,31,800 झाली असून ₹68,195 ने कमी करण्यात आली आहे. Emotion व्हेरिएंट ₹8,64,995 वरून ₹7,91,200 झाला असून ₹73,795 ने कमी झाली आहे. यासोबतच अन्य व्हेरिएंटची किंमत सुद्धा कमी करण्यात आली आहे.